लोणार शहरात धडाके बाज अवैध धंदे व दारू विक्री कोण लावणार यांच्यावर बंदी..
प्रतिनिधि शेख सज्जाद लोणार
लोणार शहरात अवैद्य धंद्याला सध्या उरुज आलेले आहे. तरी याच्यावर लवकरात लवकर आळा घालावा जेनेकरून शहरात पुन्हा कोणतीही मोठी दुर्घटना घडूनाही, नुकतीच मोठी दुर्घटना होता होता वाचली असून त्याचे मुख्यकारण अवैध्य दारू, गाजा,या सारखे नष्यामुळे होत आहे. लहान लहान मुले दारूचे आधी होत असून . त्यांना गुनेगारी करण्याची प्रवृत्ती इच्छा मनात निर्माण होत आहे. कारण नशा करण्यासाठी पैसा पाहिजे आणी पैसा कोणी देत नाही. कष्टाने आलेले पैसे माणूस पोटाची भूक भागू शकतो,रिकामे शोक पूर्ण करू शकत नाही.त्याकरिता तरुण मंडळी ही आपले नशाचे वेसण ची पूर्तता करण्यासाठी चुकीच्या मार्गाने जास्त जात आहे. काही समाज सेवक व सुशिक्षित वयक्ती ज्यांना खरोखर समाजातील युवापिढी ची चिंता आहे अश्या व्यक्तींनी पोलीस स्टेशन ला वेळोवेळी शहरात चालू असलेले धंदे बंद करण्यासाठी निवेदन दिलेले आहे तरी त्या निवेदन दखल घेत संबंधित अधिकारींनी धडाकेबाज कारवाई करावी अशी अपेक्षा निवेदन करते कडून होत आहे.