*पंढरपूर सिंहगड मध्ये पालक मेळावा उत्साहात संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शनिवार ७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम यांनी दिली.
सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज पंढरपूर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्याचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, पालक प्रतिनिधी दिपाली मोहिते, शंकर पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी पालक प्रतिनिधी दिपाली मोहिते, शंकर पाटील यांचे महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक प्रगतीचा अहवाल उपस्थित पालकांसमोर मांडला. दरम्यान पालकांनी पाल्याच्या प्रगतीकडे लक्ष देणे आवश्यक असून आम्ही महाविद्यालयात शक्य तो अभ्यास घेत असतो परंतु पालक म्हणून आपण ही सतर्क असणे आवश्यक आहे. जेवढी शिक्षकांची जबाबदारी तेवढीच पालकांची ही जबाबदारी असते असे मत प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम यांनी व्यक्त केले.
या मेळाव्यात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार डाॅ. संपत देशमुख यांनी मानले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.