पालवी संगोपन प्रकल्पाला शैक्षणिक साहित्याची मदत* ○ *पंढरपूर सिंहगड कॉलेजचा अनोखा सामाजिक उपक्रम*

 *पालवी संगोपन प्रकल्पाला शैक्षणिक साहित्याची मदत*




○ *पंढरपूर सिंहगड कॉलेजचा अनोखा सामाजिक उपक्रम*


पंढरपूर: प्रतिनिधी 

समाजामध्ये वावरत असताना आपले सामाजिक कर्तव्य या भावनेतून समाजातील गरजवंतांना मदतीचा हात देणे हे आपले सामाजिक कर्तव्यच आहे. याच भावनेतून एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर कोर्टी येथील पालवी या संगोपन प्रकल्पास सिंहगड कॉलेज मधून एनएसएस क्लब आणि रोटरॅक्ट क्लब या टीम कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

  पालवी या सामाजिक संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना प्रा. सुमित इंगोले म्हणाले, पालवी हा संगोपन प्रकल्प समाजातील अनाथ होतकरू विद्यार्थ्यांचे गेल्या अनेक वर्षापासून संगोपन करत आहे. त्यामुळे पालवी या संस्थेचे कार्य खरोखर उल्लेखनीय आणि आदर्शदाही आहे आणि त्यांच्या या प्रकल्पाला मदत करणे हे आपले सामाजिक कर्तव्यच असल्याचे मत प्रा. सुमित इंगोले यांनी बोलताना व्यक्त केले.

यावेळी सिंहगड महाविद्यालयकडून वेळोवेळी केलेल्या मदतीची व सहकार्यचं कौतुक पालवी संगोपन प्रकल्पकडून प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. या कार्यक्रमास एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख यांनी या शैक्षणिक साहित्यामध्ये मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सामाजिक कार्यातून मिळणारा आनंद हा आयुष्यात उमेद निर्माण करतो अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. पालवी संगोपन प्रकल्पामध्ये फुल नाही पण फुलाची पाकळी का होईना मदत केल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहरा सांगत होता.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख व प्रा. सुमित इंगोले आदींसह एनएसएस प्रेसिडेंट नागेंद्रकुमार नायकुडे, एनएसएस सेक्रेटरी अथर्व कुराडे , प्रमुख विद्यार्थी प्रतिनिधी किशोर नरळे, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी राशिद पठाण, हर्षद शिंदे, सत्यम कापले, चेतन मासाळ, आकाश चौगुले, अनुप नायकल, सुमित अवताडे, प्रणव देवराम, वैष्णवी कंडरे, श्रद्धा पंधे, प्राप्ती रुपनर, तेजस्वी खांडेकर, धनश्री हाके, साक्षी भिवरे याच बरोबर रोटरॅक्ट प्रेसिडेंट ईश्वरी ताठे, रोटरॅक्ट क्लबसेक्रेटरी प्रणव हेंबाडे याच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad