पंढरपूर सिंहगड मध्ये " इथिक्स इन इंजिनीअरिंग प्रॅक्टिस " या विषयावर व्याख्यान संपन्न*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये " इथिक्स इन इंजिनीअरिंग प्रॅक्टिस " या विषयावर व्याख्यान संपन्न*




पंढरपूर: प्रतिनिधी


        एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग व इनोवेशन क्लब (आई.सी) यांच्या संयुक्त विद्यमाने व कॉलेज चे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर सिंहगड मध्ये इथिक्स इन इंजिनीअरिंग प्रॅक्टिस या विषयावर दिनांक १२ ऑक्टोंबर रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली. 

     यामध्ये प्रा. आशिष जोशी यांनी सध्याच्या युगात नैतिकदृष्ट्या काय योग्य किंवा स्वीकार्य आहे याबाबतच्या श्रद्धा, नितिमत्ता, नितिनियम कसे करायचे याविषयी प्रत्यक्ष प्रात्याक्षिक करून दाखविले.

       महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यादरम्यान बोलताना म्हणाले, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त परंतु विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व नोकरीत संधी मिळण्याच्या प्रक्रियेतील एका महत्त्वाचा भाग म्हणून असे कार्यक्रम नेहमीच आयोजित केले जातात. अशा कार्यक्रम सर्वानी सहभाग घेणे आवश्यक असते. असे मत डॉ. कैलाश करांडे यांनी व्यक्त केले.

       या प्रोग्रॅम अंतर्गत तृतीय वर्गात शिकणाऱ्या ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम यशसवी करण्यसाठी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. अमृता माळी, प्रा.अंजली पिसे, प्रा. वैभव गोडसे, प्रा. स्वप्नील टाकळे, प्रा. राहुल घोडके, अमित करांडे व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अवंतिका भोसले यांनी जबाबदारी पार पाडली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad