सांगोला साखर कारखान्याचे बॉयलर व मोळीपूजन शुभारंभ उत्साहात संपन्न*

 *सांगोला साखर कारखान्याचे बॉयलर व मोळीपूजन शुभारंभ उत्साहात संपन्न*


*४लाख मे.टन गाळप करण्याचे उद्दिष्ट* - अभिजीत पाटील


*कामगारांना दिवाळी सणासाठी १५ दिवसांचा पगार बोनस जाहीर* - अभिजीत पाटील 


*पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना न्याय देऊ* - अभिजीत पाटील



प्रतिनिधी/-


धाराशिव साखर कारखाना युनिट ४ सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना वाकी-शिवणे या कारखान्याच्या सन २०२३-२४-या ९वा गाळप हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन व मोळी पूजन समारंभ ह.भ.प.ज्ञानेश्वर (माऊली) पवार महाराज तसेच सांगोलाचे आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, शेकापचे नेते डॉ.बाबासाहेब देशमुख, युवा नेते डाॅ.अनिकेत भाई देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न करण्यात आला .


तसेच सौ.प्राजक्ता व धनंजय सुभाष पाटील (गादेगाव) व सौ.प्रियांका व श्री.अभिजीत शहाजी नलवडे( शिरबावी) यांच्या शुभहस्ते सत्यनारायण व महापूजा करण्यात आली.      


बारा वर्षे बंद अवस्थेत असलेला सांगोला साखर कारखाना पुन्हा गतवैभवास प्राप्त करण्यासाठी धाराशिव साखर कारखान्याचे संचालक कर्मचारी अधिकारी तसेच सांगोला तालुक्यातील सर्व नेतेगण या सर्वांचा अधिकचा वाटा आहे. सांगोला तालुक्यातील सर्व शेतकरी सभासदांनी आपला सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करण्याची भूमिका या ठिकाणी ठेवावी असे उद्गार अभिजीत पाटील यांनी काढले. सांगोला साखर कारखान्याचे चार लाख टन गाळपाचे उद्दिष्ट असून ऊस तोडणी वाहतुकीसाठी यंत्रणा सर्व सज्ज असून गाळपास सुरूवात होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना जिल्ह्यातील साखर कारखानदारीबरोबरच योग्य दर देण्याची भूमिका असल्याचे डीव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.


सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याचे संचालक शहाजी नलवडे, ॲड.ढाळे, तुकाराम जाधव, अशोक शिंदे, राजेंद्र देशमुख, सदाशिव नवले, यशोधन चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नवनाथ पाटील, आय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल खरात, सुपली सरपंच बाळासाहेब यलमार, दामाजी कारखान्याचे मा.संचालक कांतीलाल ताठे, नंदकुमार बागल, विठ्ठल कारखान्याचे मा.संचालक रायाप्पा हळणवर, मधुकर मोलाणे, आनंद पाटील, विठ्ठल कारखान्याचे संचालक दिनकर चव्हाण, तुकाराम मस्के, धनंजय काळे, सिद्धेश्वर बंडगर, संभाजी भोसले, समाधान गाजरे, उमेश मोरे, धनाजी खरात आदी उपस्थित होते.


याप्रसंगी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर धनंजय पाटील, संचालक भागवत चौगुले, रणजीत भोसले, संजय खरात, सुरेश सावंत, संदीप खारे, दिनेश शिळ्ळे, जयंत सलगर यासह जनरल मॅनेजर श्री. रविंद्र साळुंखे, चिफ इंजिनिअर राजेंद्र सगरे, चिफ केमिस्ट अनिल अवाळे, सुरक्षा अधिकारी परमेश्वर कदम अधिकारी, शेतकी अधिकारी श्री.काझी यासह कर्मचारी, शेतकरी बांधव, तोडणी वाहतूक ठेकेदार, आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रस्तावनापर मनोगत प्राध्यापक तुकाराम मस्के यांनी करून कार्यक्रमाचे आभार धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी केले तसेच सूत्रसंचालन नितीन सरडे यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad