*पंढरपूर सिंहगड मध्ये "रिअल टाईम ॲप्लीकेशन ऑन कंट्रोल सिस्टीम" या विषयावर व्याख्यान*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील नॅक ए प्लस मानांकान प्राप्त असलेले एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात शुक्रवार दिनांक २० ऑक्टोबर २०२३ रोजी "रिअल टाईम ॲप्लीकेशन ऑन कंट्रोल सिस्टीम" या विषयावर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन (ईसा) व सिंहगड कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने डाॅ. विजयकुमार बिरादार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. भालचंद्र गोडबोले यांनी दिली.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाच्या सुरुवातीस प्रमुख व्याख्याते डाॅ. विजयकुमार बिरादार यांचे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. भालचंद्र गोडबोले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यादरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डाॅ. विजयकुमार बिरादार यांनी बेसिक, माॅडर्न व ॲडव्हान्सड कंट्रोल सिस्टीम, रिअल टाईम ॲप्लीकेशन्स ऑफ कंट्रोल सिस्टीम, कोअर शाखेचे महत्व आणि विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टीचा अभ्यास करावा यावर आधारित महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानात २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डाॅ. भालचंद्र गोडबोले, प्रा. अंजली चांदणे, आदींसह विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.