*पंढरपूर सिंहगडच्या भावी अभियंत्यांची बांधकामास भेट*
पंढरपूर:
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील प्रथम वर्ष अभियांत्रिकी मध्ये शिक्षण घेत असलेल्या क्लास ए सी आणि ई या तुकडीतील भावी अभियांनी शनिवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी बांधकामास भेट देऊन माहिती घेतली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
यादरम्यान विद्यार्थ्यांना इमारतीचे वेगळे भाग व त्यांचे काम याविषयी माहिती जाणून घेतली. बांधकाम बाबतीत विद्यार्थ्यांना माहीती व्हावी यासाठी हि भेट आयोजित करण्यात आली होती.
देशाला उत्तम अभियंत्यांची गरज आहे. देशाच्या विकासात अभियंत्याचे योगदान महत्वपूर्ण आहे. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानात खुप मोठे बदल घडत आहे. हे बदल कसे आहेत तसेच भावी अभियंत्यांच्या कल्पनेतून नवनवीन आयडिया विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून उभा राहतील या हेतूने विद्यार्थ्यांची बांधकामास भेट आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये २०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
हि भेट यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम, प्रा. मिलिंद तोंडसे, प्रा. निखत खान यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.