पंढरपुरात महाराष्ट्र केसरीची दोन दिवस निवड चाचणी जिल्हा निवड चाचणी व कुमार श्री चे आयोजन

 पंढरपुरात महाराष्ट्र केसरीची दोन दिवस निवड चाचणी 


जिल्हा निवड चाचणी व कुमार श्री चे आयोजन



पंढरपूर 


पांडुरंग परिवार आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीचे पंढरपुरात आयोजन केले असल्याची माहिती कृ उ बा सभापती हरिष गायकवाड, आणि युवा नेते प्रणव परिचारक यांनी दिली. 


  65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा लवकरच होणार आहे. या कुस्ती स्पर्धेसाठी सध्या सर्वत्र निवड चाचणी होत असून सोलापूर जिल्ह्याची निवड चाचणी यंदा पंढरपुरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात होणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषद , पांडुरंग परिवार व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या निवडचाचणीचे आयोजन केले जात आहे. माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य दिव्य प्रमाणात मर्दानी रांगड्या कुस्ती स्पर्धेला प्रोत्साहन मिळावे यासाठी, उमेशराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली निवड चाचणी आयोजित केली आहे. 


17 आणि 18 ऑक्टोबर रोजी बाजार समितीच्या प्रांगणात वजनी गट, मातीतली कुस्ती, मॅटवरील कुस्ती आणि खुला गट अशा चार भागांमध्ये निवड चाचणीला सुरुवात होणार आहे. 17 ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता माजी आमदार प्रशांतराव परिचारक आणि कुस्तीतील जागतिक सुवर्णपदक विजेते राहुल आवारे यांच्या हस्ते या निवड चाचणीचे उद्घाटन होईल. सलग दोन दिवस चालणाऱ्या निवड चाचणीमध्ये कुमार केसरी स्पर्धेची ही निवड चाचणी होणार आहे. तर 18 ऑक्टोंबर रोजी दुपारी पाच वाजता आमदार समाधान आवताडे आणि तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते तर उमेशराव परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली या निवड चाचणीतील कुस्तीगिरांचा बक्षीस वितरण समारंभ होईल. या निवड चाचणीत निवड होणारे कुस्तीगीर हे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पात्र होणार आहेत. 


कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड आणि उपसभापती राजूबापू गावडे यांच्या माध्यमातून आणि पांडुरंग परिवारातील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सहकार्यातून 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीचे नियोजन होत आहे. या निवड चाचणी मध्ये सोलापूर जिल्ह्यातील नवोदित कुस्तीपटू पैलवानांनी सहभागी व्हावे. असे आवाहन यावेळी उपसभापती राजुबापू गावडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad