स्वेरीमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ आणि ‘जागतिक विद्यार्थी दिन’ साजरा


स्वेरीमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ आणि ‘जागतिक विद्यार्थी दिन’ साजरा



पंढरपूर – भारताचे थोर शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त पंढरपूर येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्युट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘राष्ट्रीय सेवा योजना’ आणि मॅकेनिकल इंजिनिरिंगच्या मेसा (मॅकेनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन) यांच्यातर्फे ‘वाचन प्रेरणा दिन’ आणि ‘जागतिक विद्यार्थी दिन’ साजरा करण्यात आला. 

        स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. रविकांत साठे तसेच मेसा चे समन्वयक प्रा. संजय मोरे व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने स्वेरीत ‘वाचन प्रेरणा दिन’ आणि ‘जागतिक विद्यार्थी दिन’ साजरा करण्यात आला. प्रारंभी दिवंगत शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे (१५ ऑक्टोबर) औचित्य साधून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शास्त्रज्ञ डॉ. कलामांना वाचनाची आवड होती त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ते खूप प्रिय होते. तरुणांना व विद्यार्थ्यांना डॉ. कलाम यांच्यामुळे वाचण्याची आवड निर्माण झाली होती. यावेळी ‘वाचन प्रेरणा दिना’च्या निमित्ताने महाविद्यालयाच्या नूतन इमारतीमधील मुख्य ग्रंथालय विशेष सजवले होते. यामध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या पुस्तकांपासून ते स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे या निमित्ताने पूजन करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये डॉ. कलाम यांच्या विविध मिसाईल्सची माहिती, त्यांचे विचार, त्यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांना मिळालेले विविध पुरस्कार, त्यांचा विज्ञान क्षेत्रातला अनुभव, त्यांचा जीवन प्रवास या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती भव्य पोस्टर्सवर छापून भिंतीवर लावले होते. या पोस्टर्सचे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रकारे सादरीकरण केले. भारतरत्न डॉ.कलामांची प्रेरणादायी भाषणे व त्यांचे आत्मचरित्र यावर विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला. मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची पुस्तके वाचताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसून येत होता. यावेळी ग्रंथपाल प्रा. सतीश बागल, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, इतर प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, मेसाच्या विद्यार्थी अध्यक्षा आरती चौगुले, अभिषेक मुरडे,पार्थ रोंगे, प्रणव पाटील व इतर विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन निकिता सुर्यवंशी यांनी केले तर अभिषेक बुर्रा यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad