*पंढरपूर मध्ये सिंहगड फीट इंडिया फ्रीडम रन ४.० हा उपक्रम संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात फीट इंडिया फ्रीडम रन ४.० या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या उपक्रमांतर्गत योगाचे व प्राणायामाचे प्रशिक्षण घेण्यात आले व हे प्रशिक्षण देण्यासाठी प्रा. आनंद वाघमारे लाभले या उपक्रमाचा उद्देश उत्तम आरोग्य, फिटनेस लोकांमध्ये चालण्याची आणि धावण्याची सवय लावणे हा "फीट इंडिया फ्रीडम रन ४.०" या उपक्रमाचा उद्देश आहे. निरोगी जीवनशैलीसाठी "स्वच्छ भारत, स्वस्थ भारत" या थीमसह फीट इंडिया फ्रीडम रन ४.० या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दैनंदिन जीवनात आरोग्यासाठी महत्वाचा घटक म्हणजे व्यायाम,योगा, प्राणायाम याच महत्व कळावे म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यासाठी ची काळजी आणि महत्व जागृत करने हा उद्देश महाविद्यालयाचा असल्याची माहिती महाविद्यालयचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
आपल्या दैनंदिन जीवनात व्यायाम, योग, ध्यान हे समाविष्ट केल्याने शारीरिक आरोग्याचं नाही तर मानसिक आरोग्य सुद्धा सुधारते आणि नवीन उर्जा व शांती मिळते ही माहिती योगा मार्गदर्शक यांनी दिली
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. सी. एम. देशमुख व प्रा एस. एस. इंगोले यासमवेत एनएसएस प्रेसिडेंट नागेंद्रकुमार नायकुडे, एनएसएस सेक्रेटरी अथर्व कुराडे, प्रमुख विद्यार्थी प्रतिनिधी किशोर नरळे, नाना वाघमारे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी राशिद पठाण, हर्षद शिंदे, सत्यम कापले, चेतन मासाळ, आकाश चौगुले, अनुप नायकल, प्रणव देवराम, वैष्णवी कंडरे, तेजस्वी खांडेकर, श्रद्धा पंधे, प्राप्ती रुपनर यासह सर्वांनी मिळून प्रकल्प पूर्ण क्षमतेने केला व सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.