लोहा शहरातील वाहनधारक आले वटनिवर कारवाईला ब्रेक लागेना पुढे कारवाई चालूच राहील पो. नि. चिंचोलकर
नांदेड जिल्ह्याच्या लोहा शहरातील कायदा व सुव्यवस्था आबादीत ठेवण्यासाठी लोहा पोलिस ठाण्याचा मी एक ठाणे प्रमुख म्हणून येथे काम करीत असताना जनतेला वाहतुकीचा कसल्याच प्रकारचा त्रास होऊ देणार नाही यांची जबाबदारी माझ्यावर असल्याचे लोहा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी तेज महाराष्ट्र वार्ता न्यूजशी बोलताना सांगितले दिली आहे. लोहा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या व महत्त्वाच्या ठिकाणी शाळा कॉलेज समोर टुक्कार सडक छाप हुलडबाजी स्टंटबाजी करणाऱ्याची तर मुळीच गय केली जाणार नाही जर कोणी यांची शिफारस करत खबरदार पोलीस ठाण्यात याल तर पोलीस ठाण्याच्या वतीने दबंग पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी इशारा दिला आहे
नांदेड जिल्हासह ग्रामीण भागात सध्याच्या परिस्थिती मध्ये शहरातील अनेक ठिकाणी गणरायाची स्थापना करण्यात आली असून अशा ठिकाणी सुद्धा पत्त्याचा डाव मांडणाऱ्यांना सुद्धा इशारा देण्यात येते की जर कोणी पोलिसांच्या नजरेस सदरचा डाव खेळताना दिसून आल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येईल असा ही इशारा देण्यात आलेला आहे
अशा महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा देशी दारू ढोसून कोणी धिंगा मस्ती करून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला तर कारवाईला समोरच जावे लागेल असेही पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी सांगितले आहे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत चांगलेच वाहनधारक वाटणीला आले असले तरी लोहा पोलीसाच्या कारवाईला ब्रेक लागेना पुढे अशीच कारवाई चालूच राहील अशी पो. नि. चिंचोलकर यांनी माहिती दिली आहे