लोहा पोलिसांनी वाहनावर दादा काका मामा लिहिणाऱ्या वाहन धारकावर केली कारवाई
लोहा तालुका प्रतिनिधी (शुभम उत्तरवार)
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी शरद मंडलिक यांच्या आदेशानुसार व सूचनेनुसार लोहा पोलीस ठाण्याचे " दबंग " पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी पोलीस ठाण्याच्या वतीने एक दमदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्या प्रमाणे लोहा पोलीस ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी आपले पोलीसाचे कर्तव्य काय असते आपल्या वर्दीतुन दाखवून देत आहे. या सदरच्या मोहिमेमध्ये वाहनावर दादा काका मामा लिहिणाऱ्या वाहनधारकावर पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे
जिल्ह्यातील लोहा पोलीस ठाण्यात कार्यक्षेत्रात म्हणजे शहरात वाहनावर दादा काका मामा असे लिहून शहरात मिरवणाऱ्या वाहनावर लोह पोलिस ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याचे सर्व पोलीस कर्मचारी सदरच्या मोहिमेत उतरले असल्यामुळे आता वाहनधारकात चांगलीच धास्ती बसली असल्याचे लोहा येथे दिसून येत आहे फॅन्सी नंबर प्लेट, दादा काका मामा लिहिणाऱ्या वाहनावर सक्त कारवाई मोठ्या आवाजाचे बुलेट फॅन्सी बुलेट यांच्यावर कारवाही करण्यात येत असून १० वाहने जप्त केली तर १६३ वाहणावर ८१ हजार ५०० रुपयाचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी तेज महाराष्ट्र वार्ता न्यूजशी बोलताना माहिती दिली आहे
लोहा पोलीस स्टेशन कडून आतिक्रण धारकासह वाहन धारका विरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली असून दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी लोहा पोलीस स्टेशन कडून शहरातील सर्व महत्त्वाच्या चौकामध्ये वाहने चेकिंग करण्यात आली आहे
तर या कारवाईत ज्या वाहनावर फॅन्सी नंबर प्लेटचा वापर करण्यात आला जसे की दादा काका मामा पाटील बॉस काही शायरी अशा वाहनावर सक्त कारवाई करून सदरची वाहने जप्त करण्यात आली आहे