*पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागांमध्ये "इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन" चे उद्घाटन*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये "इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनचे २के२३" उद्घाटन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. भालचंद्र गोडबोले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. दरम्यान प्रा. प्रदीप व्यवहारे यांनी EESA बदल माहिती दिली. यावेळी असोसिएशनच्या अध्यक्ष पदी सागर दुधाळ यांची निवड झाल्याबद्दल तसेच असोसिएशनच्या पदाधिकारी यांचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ.भालचंद्र गोडबोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सागर दुधाळ, उपाध्यक्ष ऐश्वर्या जाधव, दीपक बडके, सचिव अनिकेत माने, खजिनदार तेजस कुलकर्णी, संयुक्त खजिनदार दिनेश कारंडे, हा कार्यक्रम यशस्वी होणेसाठी वैष्णवी जाधव पाटील, आकाश चौगुले, रितेश येलपले, अनिष्का राऊत, सरस्वती लेंगरे, यश पवार, गणेशकर अनिकेत, गोडसे सानिका, नेहा मोरे, श्रद्धा पंधे, अस्मिता जेधे, भक्ती कदम, सचिन हिंचाजरी आदी पदाधिकाऱ्यांची इसा (ESSA) २०२३-२४ निवड करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील विभाग प्रमुख डाॅ. भालचंद्र गोडबोले, प्रदीप खांडेकर, प्रा. किशोर जाधव, प्रा. अमोल गोडसे, दत्तात्रय कोरके आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेंद्र कुमार नायकुडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार विनोद मोरे यांनी मानले.