स्वेरीत ‘ऑलम्पस २ के २३’ च्या पोस्टरचे उदघाटन
येत्या दि. १५ व १६ सप्टेंबर रोजी स्वेरीत ‘ऑलम्पस २ के २३’ या तांत्रिक स्पर्धेचे आयोजन
पंढरपूर- स्वेरीतील विविध उपक्रमांमुळे अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांना आपले सुप्त गुण सादर करण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ मिळते. यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासास एक प्रकारे चालना मिळते. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्याच्या वृत्तीत वाढ होते. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांचे आकर्षण असलेल्या ‘ऑलम्पस २ के २३’ या तांत्रिक स्पर्धेचे येत्या दि. १५ व दि. १६ सप्टेंबर रोजी आयोजन केले आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून नुकतेच या तंत्रस्पर्धेच्या पोस्टरचे उदघाटन प्रमुख पाहुणे व शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू आणि रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.अशोक भोईटे यांच्या हस्ते व स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, संस्थेअंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवार, दि. १५ व शनिवार, दि. १६ सप्टेंबर रोजी आयोजिलेल्या ‘ऑलम्पस २ के २३’ या तांत्रिक स्पर्धेत ड्रॉ-कॅड, टेक्नो-मेक क्विझ, ब्रीज मेकिंग, कॅड रेस, सिव्हील टेक्नो क्विझ, सर्वे हंट, इलेक्ट्रो एक्सटेम्पोर, ई-क्विझ, इलेक्ट्रिकल मास्टर, मिरर कोड, टेक एनिमेशन, पोस्टराईज- पोस्टर प्रेझेंटेशन, सर्किट सुडोको, प्रोग्राम मनिया, वीन टू बझ, पेपर प्रेझेन्टेशन, अॅग्रो चॅलेंज- प्रोजेक्ट कॉम्पिटीशन, आयडिया रेज, कॅम्पस ड्राईव्ह, टेक्नॉ स्पीच वॉर, सीएसई ब्रेनवेव्ह चॅलेंज, जस्ट अ मिनिट टायपिंग असे जवळपास २३ तांत्रिक इव्हेंटस् असून यासाठी विजेत्यांना जवळपास एक लाखांपर्यंतची रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्रे ही बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या तांत्रिक स्पर्धेत अभियांत्रिकी तसेच पदविका अभियांत्रिकीचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती, संशोधन अधिष्ठाता डॉ.अमरजित केने, समन्वयक प्रा. डी.टी. काशीद यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या वतीने ऑलम्पस २ के २३ चे विद्यार्थी अध्यक्ष ऋतुराज तारापूरकर, विद्यार्थी उपाध्यक्ष दीपक शिंदे व श्रेयस कुलकर्णी, विद्यार्थी सचिव अविराज नागटिळक, सहसचिव सोनाली करवीर, खजिनदार चेतन टमटम व सह खजिनदार शिवभक्ती देशमुख व दत्तात्रय अहेरवाडी यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. ‘ऑलम्पस २०२३’ च्या निमित्ताने अभियांत्रिकीच्या सर्व विभागात जय्यत तयारी केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. ‘ऑलम्पस २ के २३’ या स्पर्धात्मक कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ऑलम्पस चे समन्वयक प्रा.दिगंबर काशीद (मोबाईल- ८२०८७२४२६६), प्रा. सचिन काळे (मोबा.-९९६०११८५८०), प्रा.सागर वाघचवरे (मोबा.-९६६५१८७८७५), प्रा.धनराज डफळे (मोबा.-९७६८५१५०२३), प्रा. रविकांत साठे (मोबा.-७७०९९४१४८२) व प्रा.निमिषा देवल (मोबा.-९६८९६३८३४४) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी केले आहे.