पंढरपूर सिंहगड मध्ये "नो कोड लो कोड" या विषयावर व्याख्यान*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये "नो कोड लो कोड" या विषयावर व्याख्यान*



पंढरपूर: प्रतिनिधी 


कोर्टी (ता. पंढरपूर) एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी "नो कोड लो कोड" या विषयावर प्रा. दिपक बडगुजर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते हे मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांनी दिली. 

  या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपक बडगुजर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

या वेळी मार्गदर्शन करणारे दीपक बडगुजर यांचे महाविद्यालयाकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

  यावेळी मार्गदर्शन करताना दीपक बडगुजर म्हणाले, आज संपूर्ण जग मोबाईल व इंटरनेट च्या साहाय्याने जोडले आहे. आपण सर्वजण डिजिटल इंडिया कडे वाटचाल करत असताना "नो कोड लो कोड" बद्दल चे ज्ञान विद्यार्थ्यांना अवगत असणे नितांत गरजेचे आहे. मागील काही वर्षात जगभरात अनेक टेक्निकल बदल घडल्याचा घटना आपण पाहतो, असतो ऐकत असतो. तरीही आपण या विषयाकडे दुर्लक्ष करत आहोत. परंतु येणाऱ्या काळात या विषयाची व्याप्ती वाढवायची असेल तर विशेष करून कॉम्प्युटर सारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन जॉबच्या संधी मिळतील. 

  हे व्याख्यान कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागातील द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होते. या व्याख्यानात कम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागातील ७५ हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यशाळेत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. संदीप लिंगे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad