पंढरपूर सिंहगड मध्ये "आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मिशन लर्निग" या विषयावर व्याख्यान संपन्न
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात शुक्रवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी "आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मिशन लर्निग" या विषयावर व्याख्यान प्रा. सुभाष पिगंळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
या व्याख्यानाच्या सुरुवातीस इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी प्रा. सुभाष पिंगळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या वेळी मार्गदर्शन करताना प्रा. सुभाष पिगंळे म्हणाले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निग क्षेत्रात डेटा आणि इन्फाॅर्मेशन अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रकार, सुपरवायझ्ड लर्निग, अन् सुपरवायझ्ड लर्निग, सेमी सुपरवायझ्ड लर्निग, रिइनफोर्फसमेन्ट लर्निग आणि विविध आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिदम-लिनिअर रिग्ररेशन, लाॅजिस्टिक रिग्रेसेन, आर्टिफिशियल न्युरल नेटवर्क आदी विषयांवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
हे व्याख्यान इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात तृतीय व चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. यामध्ये १५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. दरम्यान विद्यार्थ्यांकडून गुगल कोलॅब वर प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. हा यशस्वी करण्यासाठी प्रा. सिध्देश्वर गंगोंडा, प्रा. गणेश बिराजदार आदींसह विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.