मुकबधीर व मतिमंद विद्यालयातील चिमुकल्यांनी स्वेरी मध्ये केले रक्षाबंधन


मुकबधीर व मतिमंद विद्यालयातील चिमुकल्यांनी स्वेरी मध्ये केले रक्षाबंधन 



पंढरपूर- निवासी मूकबधीर व मतिमंद विद्यालयातील लहान मुलांना स्वेरीचा कॅम्पस आल्हाददायक आणि उत्साही वाटत होता. शरीराने मुकबधीर असले तरी विद्यार्थी मनाने उत्साही आणि आनंदी असल्याचे जाणवत होते. या आनंदाचे आणि उत्साहाचे कारणही आनंददायी असेच होते. प्रसंग होता स्वेरीच्या भव्य कॅम्पस मधील विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा करण्याचा! 

           श्री गणेश रुग्णसेवा मित्र मंडळ, पंढरपूर संचलित निवासी मुकबधीर विद्यालय व मतिमंद विद्यालयातील बालकांसोबत स्वेरीज पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन साजरे केले. रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासोबतच विद्यालयातील मुकबधीर विद्यार्थ्यांनी ‘राष्ट्रीय एकात्मता' या विषयावरील मुकपट सादर केले. या मुकपटांचे स्वेरीच्या सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी विशेष कौतुक केले. निवासी मुकबधीर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मृणाल बडवे व मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप कवडे हे आपल्या विद्यालयातील ४४ लहान मुलांसमवेत स्वेरीत आले होते. प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या हातांनी राखी बांधली रक्षाबंधनाचा आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर या लहान मुलांनी डिप्लोमाच्या वर्कशॉप, वर्ग, मोठमोठी यंत्रे, संगणक, खेळाचे मैदान, आदींची पाहणी केली आणि ही चिमुकली आनंदून गेली. स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी त्या लहान बालकांना स्वेरीच्या कॅम्पसमध्ये आणून त्यांच्या कलागुणांची विशेष दाखल घेतल्यामुळे मेकनिकल इंजिनिअरिंग विभागातील ‘मेसा’ च्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा.ए.डी.सपकाळ, मेसाचे अध्यक्ष वैभव क्षीरसागर व इतर प्राध्यापक, विद्यार्थी, मेसा समन्वयक प्रा.एस.जे.जगताप तसेच जवळपास २५० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. मेसाच्या सचिव सृष्टी चव्हाण यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad