पंढरपूर सिंहगड मध्ये "मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस" या विषयावर व्याख्यान संपन्न

 पंढरपूर सिंहगड मध्ये "मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस" या विषयावर व्याख्यान संपन्न




पंढरपूर; प्रतिनिधी


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये शुक्रवार दिनांक ८ सप्टेंबर २०२३ रोजी प्रा. एस ए जेऊरकर यांचे "मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस" व "ऍडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.

सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाच्या सुरुवातीस प्रा. एस. ए. जेऊरकर यांचे स्वागत 

प्रा. अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

    विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. जेऊरकर म्हणाले, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस विषयी ॲडव्हान्सड टेक्नॉलॉजी थ्रीडी प्रिंटिंग द्वारे मॉडेल तयार करणे, वर्क टाईम ऑप्टिमाइज करणे, तसेच सिंगल पीस कोणत्याही प्रकारचा कॉम्प्लिकेटेड कंपोनंट तयार करणे, पारंपारिक मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ला चॅलेंजिंग आहे, पण थ्रीडी प्रिंटिंग द्वारे तसेच लेझर प्रिंटिंग द्वारे कॉम्प्लिकेटेड कंपोनेंत सुलभ रीत्या तयार करता येत असल्याचे नमूद केले या विषयावर सरांनी पारंपरिक प्रोसेसेस कालबाह्य ठरतील. नवीन ऍडव्हान्सड टेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांना करिअर ऑपपॉर्च्युनिटी म्हणून उद्योजक तयार करण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मत प्रा. जेऊरकर यांनी यादरम्यान बोलताना व्यक्त केले.

  हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांचा उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा. समाधान माळी, प्रा. धनंजय गिराम सह मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad