पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत मुख्याधिकारी यांचे समवेत बैठक

 पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत मुख्याधिकारी यांचे समवेत बैठक



पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अडचणी बाबत आज पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे, जनरल सेक्रेटरी अँड.सुनील वाळूजकर, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे सहकार्याध्यक्ष शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, उपाध्यक्ष संतोष सर्वगोड, अँड.किशोर खिलारे,अनिल गोयल, अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेस चे अध्यक्ष गुरु दोडीया यांच्या शिष्ट मंडळाने मुख्याधिकारी अरविंद माळी यांचेशी कर्मचाऱ्यांच्या मागण्या व अडचणी बाबत चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने शासन निर्देशानुसार चेतन वाघेला,दीपक  गोयल यांना नियुक्ती द्यावी, पंढरपूर नगर परिषदेमधील अनेक लिपिक, शिपाई व  सफाई कर्मचारी सेवा निवृत्त झाले असून अथवा सेवेत असताना मयत झाले आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरची असणारी उपदान व रजावेतनाची रक्कम मिळावी कारण सेवानिवृत्तीनंतर सर्व कर्मचाऱ्यांना मुला मुलीची लग्न कार्यासाठी प्रापचिक अडचणी अथवा दवाखान्याच्या उपचारासाठी या रकमांची आवश्यकता असल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणी येत आहेत तरी सेवानिवृत्त झाल्यानंतरची मिळणारी सर्व रक्कम त्वरित अदा करावी अशी मागणी केली त्यावेळी ३१/३/०२३ पर्यंत सेवा निवृत्त झालेल्या सर्व कर्मचारी यांची थकीत रक्कम येत्या १५ दिवसात देण्याचा निर्णय घेण्यात आला   तसेच नगरपरिषदेमधील  सर्व सफाई कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजने अंतर्गत मोफत घरे देण्याबाबत यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, नगर विकास मंत्री व आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्याबरोबर महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने चर्चा झाली होती त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरे देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या होत्या सदरचे बैठकीचे इतिवृत्त यावेळी मुख्याधिकारी  यांना देण्यात आले तसेच गुजराथी समाज यांना गुजराथी कॉलनी येथे व पंतप्रधान आवास योजने अंतर्गत बांधणेत    तयार असलेल्या 670 घरामधील एक विंग बौद्ध व मातंग समाजाच्या सफाई कर्मचारी यांना देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी पतसंस्था नंबर १ या संस्थेने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्याकडून कर्ज घेऊन नगर परिषदेमधील कर्मचाऱ्यांना कर्ज वाटप केले आहे  सदर काही कर्मचारी सध्या सेवानिवृत्त झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या मिळणाऱ्या  रजा वेतन व उपदानाच्या रकमेतून पतसंस्थेचे थकीत राहिलेले 45 लाख रुपये कपात करून पतसंस्थेस देणे आवश्यक आहे सदरची रक्कम पतसंस्थेस न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी ठेवलेल्या फिक्स डिपॉझच्या रकमा, कर्ज व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणे त्यांना वेळेत परत करणे अडचणीची ठरत आहेत तसेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे घेतलेले कर्जाचे हप्ते वेळेवर जात नसल्याने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक वारंवार पतसंस्थेच्या मागे या वसुलीसाठी तगादा लावत आहे तसेच सदर सेवा निवृत्त कर्मचारी यांनाही घेतलेल्या कर्जापोटी व्याजांचा निष्कारण भुर्दंड बसत आहे तरी लवकरात लवकर या रकमा पतसंस्थेत कपात करून मिळावेत अशी मागणी करणेत आली यावेळी मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरच देण्यात येतील, दिनांक ३१/३/२०२३  पर्यंत सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या रजावेतन व उपदानाच्या रकमा  येथे पंधरा  दिवसात दिल्या जातील तसेच सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरे देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल व पतसंस्थेची ही रक्कम लवकरात लवकर पतसंस्थेस अदा केली जाईल , नगरपरिषदेमधील मुकदम व वरिष्ठ पीक यांची रिक्त पदे भरली जातील तसेच मुकादामांचा राहिलेला सातवा वेतनाचा फरकाची रक्कम ही दिली जाईल तसेच ज्या कर्मचाऱ्यांना 12 व 24 वर्षाची पदोन्नती दिलेली नाही त्यांना ही पदोन्नती देण्याची कारवाई लवकरात लवकर केली जाईल असे आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला दिले यावेळी कामगार संघटनेचे पदाधिकारी धनजी वाघमारे, दिनेश साठे, अनिल अभंगराव, प्रीतम येळे,संजय वायदंडे,दशरथ यादव, तसेच कार्यालय अधीक्षक जानबा कांबळे जनसंपर्क अधिकारी अस्मिता निकम ,आस्थापना लिपिक दर्शन वेळापुरे,ऋषी अधटराव हे उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad