एका नगरसेवकांची बिना नंबर प्लेट असलेली गाडी पकडल्याने पो.नि. चिंचोलकर यांना लोकप्रतिनिधींचा फोन आताच्या आता गाडी सोडून द्या अन्यथा विधान भवनामध्ये तुमच्या विरोधात प्रश्न मांडू ...!!
लोहा तालुका प्रतिनिधी/ शुभम उत्तरवार
नांदेड जिल्ह्याच्या लोहा पोलीस ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी गेल्या दिवसाखाली एका नगरसेवकाची विना नंबर गाडी पकडली असल्याची चर्चा ऐकावयास मिळत असून सदरची गाडी तीन दिवसा पासून पोलीस ठाण्यातच असल्यामुळे शहरात व परिसरात चर्चेला उधान आले आहे
""" विना नंबरची गाडी सोडून द्या अन्यथा """
लोहा पोलीस ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी एका नगरसेवकाची विना नंबरची गाडी पकडल्या नंतर एका लोकप्रतिनिधीचा फोन लोहा पोलिसांत खणखणला "अन "म्हणे गाडी सोडून द्या आताच्या आताच सोडून द्या अन्यथा विधान भवनात तुमच्या विरोधात तारांकित प्रश्न मांडू असे लोकप्रतिनिधीचा पोलीस अधिकाऱ्यांना फोन येतो तर - ?
लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी शहरात मोटार वहान कायद्या अंतर्गत कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली असताना दुसरीकडे एका नगरसेवकाची विना नंबरची गाडी पकडल्याची माहिती समोर आली असून सदरची गाडी सोडण्यात यावी म्हणून लोकप्रतिनिधीचे प्रयत्न चालू असले तरी सदरची विना नंबरची गाडी लोहा पोलीसाच्या ताब्यात आहे
पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सर्वासाठी कायदा एक गरीबासाठी कायदा आणि मोठ्यासाठी मेहरबानी नसल्यामुळे एका नगरसेवकाची विना नंबरची गाडी पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी ताब्यात घेतली परंतु अध्याप तरी सोडण्यात आली नसल्याची माहिती असून पोलीस अधिकारी आणि पोलीसाचे कर्तव्य काय असते ते लोहा येथे दिसून येत आहे.