*आई-वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवून शिका- पोलीस उपनिरीक्षक सारीका शिंदे*
○ *पंढरपूर सिंहगड मध्ये मानवी हक्क आणि सुरक्षा याविषयावर व्याख्यान*
पंढरपूर: प्रतिनिधी
शिक्षणाचे महत्त्व अतुलनीय आहे. शिक्षण घेत असताना आपल्या ध्येयापर्यंत पोहचविण्याची जिद्द मनात सतत तेवत ठेवणे आवश्यक आहे. सद्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक अल्पवयीन मुले-मुली विविध गुन्हा सापडत आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून झालेल्या अनोळखी व्यक्तीसोबत मैञी करून नका त्याचे भविष्यात वाईट परीणाम होत आहेत. अनेक तरुणी सोशल मिडीयाच्या फसव्या प्रेमात अडकून बरबाद झाल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी महिलांना अन्याय, अत्याचार अथवा मानसिक त्रास होत असे तर पोलीस स्टेशन अथवा निर्भया पथकाशी संपर्क करा. पोलीस प्रशासन आपल्या मदत करेल. अनेक विद्यार्थ्यांचे आई-वडील शेतकरी आहेत. उन्हात काम करून तुम्ही शिकावे म्हणून कष्ट करून तुम्हास पैसे देत आहेत या कष्टांची जाणीव ठेऊन शिक्षण घेण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक सारीका शिंदे यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन, स्पर्धा परीक्षा विभाग आणि आय सी सी यांच्या संयुक्त विद्यमानाने "मानवी हक्क आणि सुरक्षा" या विषयावर अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उपप्राचार्य स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. भालचंद्र गोडबोले, प्रा. अंजली चांदणे, प्रा.विनोद मोरे, प्रा. किशोर जाधव, प्रा. प्रदीप व्यवहारे, प्रा. नागनाथ खांडेकर, प्रा. अमोल गोडसे, प्रा. दत्तात्रय कोरके, प्रा.अर्जुन मासाळ
प्रा. सोनाली घोडके सह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी नंदिनी भोसले, दीपाली सुडके आणि रोहित देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. स्वप्ना गोड यांनी मानले.
फोटो ओळी: पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना पोलीस उपनिरीक्षक सारीका शिंदे समोर उपस्थित विद्यार्थी.