*पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन आणि स्पर्धा परीक्षा विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा परीक्षा विषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाची सुरुवात सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित राजश्री करिअर अकॅडमी प्रमुख युवराज रदंवे व सचिन भगत यांचा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रदीप व्यवहारे यांनी केले. यावेळेस युवराज रंदवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यामध्ये युवराज रदंवे यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये कशा प्रकारे तयारी करावी याची महिती दिली. तसेच सचिन भगत यांनी आलेल्या संकटांना न खचता कसे सामोरे जायचे आणि त्यामधून कसा मार्ग शोधायचा याबद्दल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. भालचंद्र गोडबोले, प्रा. अंजली चांदणे, प्रा. विनोद मोरे, प्रा. किशोर जाधव, प्रा. प्रदीप व्यवहारे, प्रा. नागनाथ खांडेकर , प्रा. सोनाली घोडके, प्रा. अमोल गोडसे, प्रा. दत्तात्रय कोरके आणि प्रा.अर्जुन मासाळ सह सह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी नंदिनी भोसले, दीपाली सुडके आणि रोहित देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. स्वप्ना गोड यांनी मानले