लोहा येथील जुन्या न्यायालयाच्या परिसरामध्ये जुवा खेळणाऱ्यावर लोहा पोलिसांच्या पथकाने टाकली धाड सिंगम पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांची दमदार कामगिरी
लोहा तालुका प्रतिनिधी /शुभम उत्तरवार
लोहा येथील जुन्या न्यायालयाच्या परिसरामध्ये जुवा खेळणाऱ्यावर लोहा पोलिसांच्या पथकाने टाकली धाड एक लाख चौदा हजार एकसे सत्तर रुपयाचा मुद्देमाल केला जप्त सदर धाडीमध्ये एकूण 10 आरोपी अणि जुगारासाठी वापरलेले पैसे जुगार खेळण्याचे साहित्य ,पत्ते सहा मोबाईल ,एक मोटार सायकल जप्त करण्यात आले त्यांच्यावर जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12(अ)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला .सदरची कारवाई पो.नि.ओमकार चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली api चन्ना ,पोलीस उपनिरीक्षक हालसे,सपोऊनी सुर्यवंशी ,केंद्रे ,किरपने ,लाडेकर,पोलीस कॉन्स्टेबल शेळके ,मेकलवाड,होमगार्ड कदम ,क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले .