*सामाजिक कामाचा आनंद आयुष्यात उमेद निर्माण करतो-डाॅ. कैलाश करांडे*
*पंढरपूर सिंहगड मध्ये "माहिती अधिकार दिन" उत्साहात साजरा*
पंढरपूर: प्रतिनिधी
रोज नवीन काही तरी शिकण्याची जिद्द विद्यार्थ्यानी मनाशी बाळगणे आवश्यक आहे. दैनंदिन कामकाज करत असताना इतरांना आपण केलेली मदत अथवा सामाजिक कार्य याचे मनाला खुप मोठे समाधान भेटत असते. आपल्या आयुष्यातील काही क्षण समाजासाठी दिले तर त्यांचा आनंद हा वेगळा असतो. म्हणून महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अथवा इतर एँक्टीव्हिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतः सामिल होऊन सहभाग घेणे गरजेचे आहे. यातुन तुम्हास नवीन काही तरी शिकायला भेटत असते. तो आनंद जगण्यातील उमेद निर्माण करत असतो असे मत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना व्यक्त केले.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात माहिती अधिकार दिनानिमित्त डाॅ. कैलाश करांडे बोलत होते. २८ सप्टेंबर हा माहिती अधिकार दिनानिमित्त महाविद्यालयात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक अनुजा महादेव कोरके, उपविजेता ज्ञानेश्वरी राजेश भोईटे, वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक नागेंद्रकुमार शिवाजी नायकुडे, द्वितीय क्रमांक अभिषेक देवरे, प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक यश लोंढे, द्वितीय क्रमांक वैष्णवी वाघमारे आदी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपञ व सन्मानचिन्ह देण्यात आले.
माहिती अधिकार दिनानिमित्त सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेत १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख व प्रा. सुमित इंगोले सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. एन.एस. एस. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून नायकुडे नागेंद्रकुमार, पंधे श्रद्धा,चौगुले आकाश, भिवरे साक्षी,आवताडे सुमित ,खांडेकर तेजस्वी,प्रणव देवराम,कंडरे वैष्णवी, नायकल अनुप यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा पंधे, तेजस्वी खांडेकर, वैष्णवी कंडरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राती रूपनर हिने मानले.