सामाजिक कामाचा आनंद आयुष्यात उमेद निर्माण करतो-डाॅ. कैलाश करांडे* *पंढरपूर सिंहगड मध्ये "माहिती अधिकार दिन" उत्साहात साजरा*

 *सामाजिक कामाचा आनंद आयुष्यात उमेद निर्माण करतो-डाॅ. कैलाश करांडे*


*पंढरपूर सिंहगड मध्ये "माहिती अधिकार दिन" उत्साहात साजरा*



पंढरपूर: प्रतिनिधी 



रोज नवीन काही तरी शिकण्याची जिद्द विद्यार्थ्यानी मनाशी बाळगणे आवश्यक आहे. दैनंदिन कामकाज करत असताना इतरांना आपण केलेली मदत अथवा सामाजिक कार्य याचे मनाला खुप मोठे समाधान भेटत असते. आपल्या आयुष्यातील काही क्षण समाजासाठी दिले तर त्यांचा आनंद हा वेगळा असतो. म्हणून महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अथवा इतर एँक्टीव्हिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतः सामिल होऊन सहभाग घेणे गरजेचे आहे. यातुन तुम्हास नवीन काही तरी शिकायला भेटत असते. तो आनंद जगण्यातील उमेद निर्माण करत असतो असे मत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना व्यक्त केले.

    एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात माहिती अधिकार दिनानिमित्त डाॅ. कैलाश करांडे बोलत होते. २८ सप्टेंबर हा माहिती अधिकार दिनानिमित्त महाविद्यालयात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक अनुजा महादेव कोरके, उपविजेता ज्ञानेश्वरी राजेश भोईटे, वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक नागेंद्रकुमार  नायकुडे, द्वितीय क्रमांक अभिषेक देवरे, प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक यश लोंढे, द्वितीय क्रमांक वैष्णवी वाघमारे आदी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपञ व सन्मानचिन्ह देण्यात आले.

     माहिती अधिकार दिनानिमित्त सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेत १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

     या कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख व प्रा. सुमित इंगोले सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थ्यानी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.