*पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात "पावर क्वालिटी आणि हार्मोनिक्स मिटिगेशन" या विषयावर व्याख्यान*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात गुरुवार दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी प्रा. सोमनाथ लंबे यांचे "पावर क्वालिटी आणि हार्मोनिक्स मिटिगेशन" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. भालचंद्र गोडबोले यांच्या हस्ते प्रा. सोमनाथ लंबे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळेस इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. भालचंद्र गोडबोले यांनी प्रस्तावित करून उपस्थित विद्यार्थ्यांना.संबोधित केले.
व्ही. एफ. डी. या नॉन लिनअर ड्राईव्ह मुळे, लाईन व्होल्टेज मध्ये हार्मोनिक्सचा प्रवेश होतो व त्यामुळे लाईन व्होल्टेज वाढते आणि त्याचा लोड वरती परिणाम होतो. हे ड्राईव्ह जास्त क्षमतेसाठी वापरले तर त्याचा दुष्परिणाम अधिक होतो. "जास्तीत जास्त क्यु फॅक्टर "असलेले रिझोनेटेड फिल्टर वापरून त्याचा परिणाम कसा कमी केला जाऊ शकतो, यावर प्रा. सोमनाथ लंबे यांनी सखोल मार्गदर्शन केले.
दरम्यान इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील पावर क्वालिटी विषयाचे प्राध्यापक प्रा. अमोल गोडसे तसेच प्रा. प्रदीप व्यवहारे, प्रा. स्वप्ना गोड उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित होता.