आयआयटी कॉम्प्युटर्स पंढरपूर ला 2023 Milestone पुरस्कार*

 *आयआयटी कॉम्प्युटर्स पंढरपूर ला 2023 Milestone पुरस्कार*



पंढरपूर: MS-CIT प्रवेशात मैलाचा दगड गाठल्याबद्दल IIT कॉम्प्युटर्स पंढरपूर ला अश्वथ इन्फोटेक सोलापूर तर्फे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे सीनिअर जनरल व्यवस्थापक अतुल पतोडी सर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

     सोलापूर जिल्ह्यातील सर्व MS-CIT संगणक केंद्राची विभागीय मीटिंग २०२३ सोलापूर येथील IMA हॉल  येथे झाली. एमएस-सीआयटी, Tally व इतर क्लिक कॉम्प्युटर कोर्सेसमध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक प्रवेश नोंदविल्या बद्दल आयआयटी कॉम्पुटर्स चे संचालक नितीन आसबे, दत्ता कळकुंबे यांना हा पुरस्कार देण्यात आला.



     गेल्या २३वर्षापासून पंढरपूर तालुक्यातील आयआयटी कॉम्यूटर ही संस्था विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याचे कार्य यशस्वीरित्या करीत आहे. यापूर्वीही अनेक पुरस्कार या संस्थेला मिळालेले आहेत. पाच संगणकांपासून ६० संगणकाची लॅब आयआयटी कॉम्प्युटर या संस्थेने उभारली आहे. या यशामागे रोहिणी मांजरे, वैष्णवी पाटील, प्रतीक्षा चव्हाण, गायत्री काटकर, सानिका बोटकर व इतर सर्व आयआयटी कॉम्प्युटरचे शिक्षक यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

   या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून आयआयटी कॉम्प्युटरवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुरस्कार प्रदान करतेवेळी एमकेसीएलचे रिजनल व्यवस्थापक, दीपक कुंभार अश्वथ इन्फोटेक चे संस्थापक रोहित जेऊरकर, LLC समन्वयक हारून शेख, मलिक शेख, शिवानंद पाटील व सोलापूर जिल्ह्यातील सर्व संगणक संस्थाचालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad