देवानंतर दुसरं स्थान डॉक्टरांचे म्हणून प्रामाणिक सेवा करा- खा.जयसिद्धेश्वर*

 *देवानंतर दुसरं स्थान डॉक्टरांचे म्हणून प्रामाणिक सेवा करा- खा.जयसिद्धेश्वर*



प्रतिनिधी

शासन दरबारी भांडून निधी आणणारे आमदार म्हणून समाधान आवताडेंची ओळख निर्माण झाली आहे, पाणी आणि आरोग्या विभागासाठी त्यांनी भरपूर निधी आणला आहे मतदारसंघात नागरिक त्यांना पाणीदार आमदार म्हणू लागले आहेत. त्याचबरोबर आरोग्य विभागाला ही भरघोस निधी आणल्याने त्यांना आरोग्य विभागाचे आरोग्यदूत म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही, माणसाचं शरीर सदृढ असावं यासाठी मोदी सरकारने आयुष्यमान भव योजना सुरू केली आहे, देवानंतर दुसरं स्थान डॉक्टरांचे आहे त्यांनी प्रामाणिक सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन सोलापूर लोकसभेचे खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांनी केले ते मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय येथे 'सेवा पंधरवडा' निमित्त आरोग्य शिबिर राबवण्यात आले. याप्रसंगी बोलत होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 'सेवा पंधरवडा' अंतर्गत 'आरोग्य शिबीर' आयोजित करण्यात आले होते. 


याकार्यक्रमाचा शुभारंभ मा.खा.डॉ.जयसिद्धेश्वरजी महास्वामी शिवाचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व आ समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे संपन्न झाला. शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांना प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेच्या 'आभा कार्ड' चे वाटप केले. तसेच पोषण आहाराचे वाटप केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ अहिरे,

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भाऊसाहेब जानकर, डॉ शिरीष कुलकर्णी, डॉ माने, भाजपा जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, नामदेव जानकर, भाजपा उपाध्यक्ष संतोष मोगले उपस्थित होते.


यावेळी बोलताना आ समाधान आवताडे म्हणाले की मंगळवेढा तालुक्यातील आरोग्य  व्यवस्था सुधारण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत असून कोट्यवधींचा निधी मंजूर केला आहे आरोग्य केंद्रात लागेल ती मदत करायला तयार आहे मात्र डॉक्टरांनी रुग्णसेवेत हयगय करता कामा नये, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा सेवा पंधरवडा सुरू आहे यामध्ये विविध शिबिरे घेऊन तपासणी केली जाते डॉक्टर व कर्मचारी जशी सेवा या शिबिरात उत्साहाने करता तशीच सेवा इतर काळातही करावी .


तालुक्यात विशेष बाब म्हणून निंबोनी येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले आहे. तसेच ग्रामीण भागात खोमनाळ, कात्राळ, ढवळस व अकोला या गावात नवीन चार आरोग्य उपकेंद्रे मंजूर केली आहेत. मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय होणार असून १०० बेडच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये रूपांतर होणार असून त्याबाबतचे ५० कोटीचे इस्टिमेट शासनास सादर झालेले आहे. आरोग्य विभागाच्या सुधारणेसाठी मागेल ते मिळेल फक्त सेवा चांगली द्या मंगळवेढा तालुक्यात वैद्यकिय उपचार व्यवस्थित मिळत नव्हते पण आता सामान्य असो व श्रीमंत या दवाखाण्याकडे लोकांचे पाय वळले पाहिजेत अशी सेवा करा असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी यावेळी बोलताना केले.


यावेळी डॉ वायचळ, डॉ शरद शिर्के, डॉ नंदकुमार शिंदे, डॉ मेटकरी, डॉ कारंडे, डॉ जाधव, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, भाजपा माजी अध्यक्ष दत्तात्रय जमदाडे, सुरेश जोशी,भाजपचे ओबीसी जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे,भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.सुदर्शन यादव,भाजपा मंगळवेढा शहराध्यक्ष श्री.सुशांत हजारे, आनंद मुढे, जगन्नाथ रेवे, धनंजय पाटील, खंडू खंदारे, यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad