*पंढरपूर सिंहगड मध्ये स्पेक्ट्रम २ के २३ उत्साहात संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शनिवार दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल स्पेक्ट्रम २ के २३ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डाॅ. मनोज जैन, डाॅ. प्रकाश दिवाकरण, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, पब्लिकेशन्स डीन डाॅ. संपत देशमुख, स्पेक्ट्रम इव्हेंट समन्वयक प्रा. उदयकुमार फुले आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
स्पेक्ट्रम २के२३ कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले. महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा शाल, श्री विठ्ठल मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज ने आयोजित केलेल्या टेक्निकल स्पेक्ट्रम २के२३ इव्हेंट मध्ये पोस्ट प्रेझेंटेशन, लॅन गेमिंग, कोडिंग काॅम्पिंटेशन, इनोव्हेटिव्ह बिझनेस आडिया, मायक्रोकंट्रोलर प्रोग्रॅमिंग, कॅडकॅम वाॅर असे एकूण १६ इव्हेंट आयोजित करण्यात आले होते. या राष्ट्रीय स्तरावरील स्पेक्ट्रम २ के २३ या इव्हेंट मध्ये विविध महाविद्यालयातील एक हजार हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामधील विविध इव्हेंट मधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यादरम्यान प्रमुख पाहुणे डाॅ. मनोज जैन, डाॅ. प्रकाश दिवाकरण, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुयोग चिखलकर, आर्या आराध्ये यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. उदयकुमार फुले यांनी मानले.
फोटो ओळी: पंढरपूर सिंहगड मध्ये स्पेक्ट्रम २ के २३ च्या उद्घाटन प्रसंगी मान्यवर