पंढरपुरात कॉंग्रेस पक्षाच्यावतीने जनसंवाद यात्रा सुरू शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या कारभाराचा केला पंचनामा

 पंढरपुरात कॉंग्रेस पक्षाच्यावतीने जनसंवाद यात्रा सुरू

शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या कारभाराचा केला पंचनामा



पंढरपूर- मोदी सरकारच्या काळात प्रचंड महागाई वाढलेली आहे. पेट्रोल, डिझेल, एल.पी.जी. यासह सर्वच वस्तूंचे भाव गगनाना भिडले आहेत. वर्षाला 2 कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने त्यांच्या चुकांमुळे नोकऱ्या संपवल्या आहेत बेरोजगारीने 45 वर्षातील उच्चांक गाठलेला आहे. विशेषत: महाराष्ट्रातून महत्वाचे प्रकल्प पळवून लावून भाजप युवकांना देशोधडीला लावले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन हवेतच गेले शेतीसाठी आवश्यक साहित्याच्या किंमती प्रचंड वाढविल्या आहेत. शेतमाला हमीभाव दिलेला नाही. मोदी सरकारने शेती साहित्यांवर 18 टक्के जीएसटी लावला असून वर्षाला 6 हजार रूपये देऊन शेतकरी सन्मान योजना राबविल्याचा आव आणत दुसरीकडे शेतकऱ्यांना कंगाल करण्याचे काम सुरू आहे. जीएसटीमुळे अनेक उद्योग व्यवहार बुडाले अगदी रोजच्या लागणाऱ्या महत्वाच्या वस्तूंवर जीएसटी लावून सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले आहे. त्यामुळे अशा सरकारच्या वतीने कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या आदेशाने व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणितीताई शिंदे, जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रदक्षिणा मार्ग असा तीन प्रभागांमध्ये भाजप सरकारचा पंचनामा सांगत जनसंवाद यात्रा सुरू करत नागरिकांना परिवर्तन घडविण्याचे आवाहन केले. यावेळी सरकारच्या चुकांचे पत्रक वाटण्यात आले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बजरंग बागल, सुहास भाळवणकर, युवक शहराध्यक्ष संदिप शिंदे, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष सागर कदम, सेवादल अध्यक्ष गणेश माने, समीर कोळी, युवक तालुकाध्यक्ष मिलिंद मोलाणे, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष अश्पाक सय्यद, देवानंद इरकल, संदिप पाटील, मिलिंद अढवळकर, नागनाथ अधटराव, देवानंद इरकल, शिवकुमार भावलेकर, सुदिप पवार, दत्तात्रय बडवे, संतोष हाके, महेश अधटराव, आनंद सोमासे, राजेंद्र गोळे, दिपक भोसले, शशिकांत चंदनशिवे, सलीम तांबोळी यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पंढरपूर शहरातील नागरिक उपस्थित होते.

ना खाऊंगा ना खाने दुगा असे म्हणणाऱ्या मोदी सरकारने राफेल विमान खरेदीत घोटाळा केला, रस्ते बांधणीत ठरविलेल्या किंमतीपेक्षा जास्त पेक्षा खर्च करून मोठा घोटाळा केला. नोटाबंदी हे सरकारचे सगळ्यात मोठे अपयश आहे स्वतंत्र भारतातील हा सर्वात मोठा घोटाळाच आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही असे म्हणणाऱ्या मोदी सरकारने आपल्या भाजप पक्षात भ्रष्टाचारी पक्षात घेवून त्यांना वॉशिंगमशीनमध्ये क्लीन करण्याचे काम केलेले आहे. देशातील मुठभर उद्योगपतींचे 16 लाख कोटी रूपयांचे कर्ज सरकारने माफ केले शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यासाठी पैसे नाहीत भाजप सरकार शेतकरी, कष्टकरी, दलित, वंचित, अल्पसंख्यांक आदिवासींचे नाही ते फक्त व्यापाऱ्यांचे सुटबुटवाल्यांचे सरकार आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भाजप, फडणवीस व तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्र सरकारच्या मदतीने षडयंत्र करून पाडले. महापुरूषांचा भाजप नेत्यांकडून वारंवार अपमान केला आहे. मराठा, मुस्लिम व धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन देऊन भाजपने ते पूर्ण न करता त्यांचा विश्वासघात केला. आरएसएसच्या मुशीत जन्मलेला भाजप हा पक्ष आरक्षण विरोधी आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले आरक्षणच भाजपला संपवायचे आहे. शेतीला 8 तास ही वीज मिळत नाही त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. वीज दर वाढविल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तुटण्याचे काम तिघाडी सरकार करीत आहे.भाजप सरकारच्या काळात राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. वसतीगृह, मुंबईतील लोकल ट्रेनही आता सुरक्षित राहिली नाही त्यामुळे असे जुलमी सरकार हटविण्याची वेळ आलेली आहे.त्यासाठी नागरिकांनी निवडणूकीत परिवर्तन घडवावे असे आवाहन पंढरपूर शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी यांनी केलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad