स्वेरी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची विविध फार्मा कंपन्यांमध्ये निवड


स्वेरी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची विविध फार्मा कंपन्यांमध्ये निवड



पंढरपूर- फार्मसी क्षेत्राशी संबंधीत विविध नामांकित कंपन्यांनी विविध पदांसाठी घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी मधील विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.

       फार्मसी क्षेत्राशी संबंधीत असलेल्या विविध नामांकित कंपन्यांच्या निवड समित्यांनी अंतिम फेरीतून फार्मसी विभागातील पँटसन फार्मा या कंपनी मध्ये प्रमोद बाबू बिराजदार, एम.जे. बायोफार्म या कंपनी मध्ये ऋषिकेश प्रमोद मोहिते, एनक्यूब इथीकल्स कंपनी मध्ये अजित दाजी खिलारे आणि जेनिअस कन्सल्टंट या कंपनी मध्ये सोनम महादेव जाधव या विद्यार्थ्यांची निवड केली आहे. रेग्युलेटरी अफेयर्स, क्वालिटी अशुरन्स, मार्केट रिसर्च अनालिस्ट अशा विविध पदांसाठी ही निवड प्रक्रिया राबवण्यात आली होती. या निवड प्रक्रिये करीता या कंपन्यांकडून अॅप्टिट्यूड, ग्रुप डिस्कशन व एच.आर. राउंड अशा वेगवेगळ्या स्तरांवर निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. नोकरीच्या या संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध व्हाव्या यासाठी कॉलेजच्या वतीने या कंपन्यांसोबत समन्वय साधण्यात आला होता व ऑनलाईन पद्धतीने ही निवड प्रक्रिया पार पडली. त्यामधून स्वेरी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे प्रयत्न आणि स्वेरीतील शैक्षणिक कल्चर यामुळेच स्वेरीतील विद्यार्थ्यांना नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यातून स्वेरीवर असलेला पालकांचा विश्वास आणखी दृढ होत आहे. विद्यार्थ्यांना स्वेरीमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण तज्ञ प्राध्यापकांकडून दिले जाते. त्यामध्ये अॅप्टिट्यूड, कम्युनिकेशन स्किल, अॅडवॉन्स टेक्निकल ट्रेनिंग, मॉक इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन, यांचा समावेश आहे. त्यामुळे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, फार्मसी चे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. प्रदीप जाधव तसेच स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी या कंपन्यांमध्ये झालेल्या इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad