*महिला सबलीकरण कृतीतून झाले पाहिजे- डाॅ. सीमा गायकवाड*
पंढरपूर: प्रतिनिधी
सध्या धावपळीच्या जीवनात महिला संरक्षण आवश्यक आहे. प्रचंड मेहनत घेतली पाहिजे. मुलीला बंधन असतात त्याप्रमाणेच मुलांना पण बंधन असणे आवश्यक आहे. महिला सन्मान हक्क हा फक्त म्हणून चालत नाही तर तो कृतीत आला पाहिजे. स्वतःचे संरक्षण स्वतःच करायला शिकले पाहिजे. भावनेच्या आहारी जाऊ नका. स्वतःच विचार न करता कुटुंबाचा विचार करून करिअर घडवावे असे मत डॉ. सीमा गायकवाड यांनी पंढरपूर सिंहगड मध्ये बोलताना व्यक्त केले.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये गुरुवार दिनांक ७ सप्टेंबर २०२३ रोजी सिंहगड कॉलेज आणि सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला सबलीकरण या विषयावर डाॅ. सुवर्णा केळकर, डाॅ. सिमा गायकवाड, ॲडव्होकेट राजश्री केदार यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे डाॅ. सुवर्णा केळकर, डाॅ. सिमा गायकवाड, ॲडव्होकेट राजश्री केदार, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम च्या चेअरमन प्रा. अंजली पिसे, आय सी सी प्रेसिडेंट प्रा. अंजली चांदणे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपस्थि मान्यवरांचा महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमात ॲडव्होकेट राजश्री केदार बोलताना म्हणाल्या, ऑनलाईन गेम च्या माध्यमातून गैर प्रकार घडत आहेत. त्यामुळे महिलांनी सावध सोशल मिडीया वापरणे गरजेचे आहे. भावनेच्या भरात काढलेला व्हिडिओचा गैरवापर होऊ शकतो यासाठी काळजी सोशल मिडीया वापरण्याचे आवाहन अॅडव्होकेट राजश्री केदार यांनी यादरम्यान केले व डाॅ. सुवर्णा केळकर यांनी महिला सबलीकरण महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
ह्या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.