*पंढरपूर सिंहगड च्या विद्युत विभागामध्ये "टेस्टिंग आणि मोटर रिवाइंडिंग" या विषयावर उद्योजकता कार्यशाळा संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन.सिहंगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी २७ सप्टेंबर २०२३ रोजी एकदिवसीय "टेस्टिंग आणि मोटर रिवाइडिंग" या विषयावर उद्योजकता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. भालचंद्र गोडबोले यांनी दिली. या कार्यशाळेचे मार्गदर्शक बाळासाहेब लोकरे यांचे स्वागत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यादरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बाळासाहेब लोकरे यांनी विद्युत मोटर चे टेस्टिंग आणि रिवाइंडिंग कसे करावे, यामध्ये आपला स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करावा याबद्दल महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत १८० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभाग प्रमुख डॉ. भालचंद्र गोडबोले, प्रा. प्रदीप व्यवहारे, प्रा. सोनाली घोडके, प्रा. नागनाथ खांडेकर, प्रा. किशोर जाधव आदींसह इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.