लोहा पोलिसांनी गोमास विक्रीला घेऊन जाणार्यावर मारला छापा छापेमारित अंदाजे गोमास 100 किलो यांच्यासह एक 80000 रुपयाचा आप्पे ऑटो केला जप्त पो.नि. चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हालसे यांची दमदार कामगिरी
लोहा तालुका प्रतिनिधी / शुभम उत्तरवार
लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार हालसे यांनी मारलेल्या छापे मारीत अंदाजे १०० किलो गोमांस यांच्यासह ८० हजार रुपयाचा ऑप्पे ऑटो पोलिसांनी जप्त केला असून या सदरच्या कारवाई मध्ये एकंदरीत एक लाख रुपयाचा मुद्देमाल आरोपी कडून हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पो.नि. चिंचोलकर यांनी दिली आहे
पोलीस स्टेशन लोहा येथे गुन्हा व कलम पोस्ट गुरंन २३० / २०२३ कलम महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ कलम ५ (क ) ९ (अ) सहकलम १०५ / ११७ महाराष्ट्र पोलीस कायदा, सहकलम ३ (१) १८१ मोटार वाहन कायदा अन्वये फिर्यादी सदाशिव पांडुरंग जामकर पोलिस हवालदार लोहा यांच्या तक्रारी वरून आरोपी फिरोज छोटू मिया खुरेशी वय ३२ येथील रहिवासी आहे
यातील आरोपीने कंधार ते लोहा जाणाऱ्या रोडवर ऑटो क्रमांक एम एच २६ टी ५३२० या वरील ऑटो चालक याने गोवंश हत्या बंदी असताना सुद्धा व त्यांना माहीत असताना त्यांच्या ताब्यातील ऑटो मध्ये खताच्या पोत्याच्या चवाळ्यात बांधलेले अंदाजे १०० किलो गोमांस छापे मारीत पकडण्यात आले आहे
त्याची किंमत अंदाजे २०० रुपये किलो दराने त्यांची किंमत २० हजार रुपये किमतीचे गोमांस त्याचे ऑटो रिक्षा किंमत अंदाजे ८० रुपये असा असून एकूण १ लाख रुपयाचा मुद्देमाल विनापरवाना बेकायदेशीर रित्या घेऊन जाताना पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या आदेशानुसार फौजदार हालसे यांनी छापा मारला आहे