बावची येथील ओढ्यावरील पुलाला साडेतीन कोटी मंजूर- आ आवताडे*

  *बावची येथील ओढ्यावरील पुलाला साडेतीन कोटी मंजूर- आ आवताडे*



प्रतिनिधी

ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास करणे योजनेअंतर्गत नाबार्डकडून मंगळवेढा येथील बावची गावाशेजारी असणाऱ्या ओढ्यावर फुल उभारणीसाठी तीन कोटी पन्नास लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली गाव भेट दौरा सुरू असताना बावची येथील ग्रामस्थांनी ओढ्यावरील पूल अत्यंत गरजेचा आहे तात्काळ तो पूल मंजूर करा अशी मागणी केली होती पत्राद्वारे संबंधित विभागाला या रस्त्यावर पूल उभारणे गरजेचे आहे त्यासाठी निधी उपलब्ध करून द्या अशी मागणी शासनस्तरावर केली होती त्यानुसार नाबार्ड कडून नुकतीच राज्यातील कामांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये या पुलालाही मंजुरी मिळाली असल्याचे आ समाधान आवताडे यांनी सांगितले.

मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ-भाळवणी-निंबोणी-बावची- सलगर हा महामार्ग असून या रस्त्यावर बावची येथे ओढ्यावर पुलाची आवश्यकता होती मोठ्या पावसात या रस्त्यावर पाणी येत होते त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत होता त्यामुळे याठिकाणी पूल गरजेचा आहे तरी या ओढ्यावर पूल करा अशी मागणी बावची येथील अशपाक पटेल व ग्रामस्थांनी केली होती त्यानुसार मागणी केल्याने सरकारने तात्काळ या पुलाला निधी दिला असून येथील दळणवळणाच्या मार्ग सुकर होणार असल्याचे आ आवताडे यांनी सांगितले.


आ समाधान आवताडे यांनी गावभेट दौरा सुरू असताना तेथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्या पुलाचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना आम्हाला दिल्या होत्या त्यानुसार आम्ही सर्व्ह करून अंदाजित आकडेवारी कळविली होती त्यानुसार मंजुरी मिळाली असून हिवाळी अधिवेशनात बुकलेट वर काम येईल त्यानंतर टेंडर प्रक्रिया केली जाईल.

ए. एन. मूलगीर, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम मंगळवेढा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.