*माळी उद्योजक शिबिरास तरुणांचा भरभरून प्रतिसाद*
राजभरातुन ४०० तरूणांचा सहभाग: डाॅ. सोमनाथ बोराटे यांची माहिती
कुर्डूवाडी: प्रतिनिधी
अलीकडे सर्व क्षेत्रात स्पर्धा वाढल्या आहेत. या स्पर्धेच्या जगात सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरी मिळणे अशक्य आहे. यासाठी तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय उभा करून उद्योजक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगावे यासाठी डाॅ. सोमनाथ बोराटे व रंगनाथ नाळे यांच्या संकल्पनेतून रविवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी कुर्डूवाडी येथे "माळी उद्योजकता शिबिर" आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले असुन या शिबिरात सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील युवकांनी भरभरून प्रतिसाद दिला असल्याची माहिती डाॅ. सोमनाथ बोराटे यांनी दिली.
या शिबिराचे उद्घाटन श्री संत सावता माळी, क्रांतीसुर्य महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमची सुरुवात करण्यात आली. या शिबिराचे अध्यक्षस्थानी शंकर वाघमारे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बाबाराजे करपे हे उपस्थित होते.
या शिबिरात सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक मार्गदर्शक दिनेश आदलिंगे व टेंभुर्णी ग्रामपंचायतचे सरपंच प्रमोद कुठे व बोराटे गुरुजी मा. सरपंच दत्तात्रय देवकर, अध्यक्ष भानवसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरात माळी समाजातील ४०० हुन अधिक तरूण सहभागी झाले होते.
या शिबिरात गाय गोठा प्रकरण व मोठे उद्योग यासाठी १६० हुन अधिक तरूणांना लेखी स्वरूपात अर्ज केले आहेत.
या शिबिराचे नियोजन रंगनाथ माळी व डॉ. सोमनाथ बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
भविष्यात महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका निहाय माळी उद्योजक शिबिराची स्थापना करून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मत या दरम्यान डाॅ. सोमनाथ बोराटे यांनी बोलताना व्यक्त केले.