*पंढरपूर सिंहगड मध्ये इशरे अवेअरनेस प्रोग्रॅम संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात शुक्रवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी प्रा. निलेश गायकवाड (पीसीसीओई पुणे) यांचे इंडियन सोसायटी ऑफ रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग व हिटिंग याविषयी "अवेअरनेस प्रोग्रॅम" आयोजित करण्यात आला होता.
महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी निलेश गायकवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात केले. यादरम्यान बोलताना निलेश गायकवाड म्हणाले, अलिकडे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना सर्व समावेशक ज्ञान असणे आवश्यक आहे. यावेळेस गायकवाड यांनी इस्रेबद्दल विस्तृत माहिती दिली. हीटिंग रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग या विषयातील उपलब्ध संधींची द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली तसेच या सोसायटीचा मेंबर झाल्यानंतर अनेक संधी उपलब्ध आहेत असे मत व्यक्त केले.
सेमिनार वर्कशॉप कॉन्फरन्सेस इंडस्ट्रियल व्हिजिट्स तसेच इतर माहिती देण्यात आली. इसरे सोसायटी च्या माहितीबद्दल विद्यार्थ्यांना जागृत करण्यात आले या क्षेत्रात असलेल्या संधी उद्योग जगताला असणारी गरज नमूद करण्यात आले. विद्यार्थ्यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट होण्यासाठी या क्षेत्रातील नॉलेज माहित असण्याचे गरजेचे आहे असे सांगण्यात आले पुढे चालून विविध क्षेत्रात इस्रेचा प्रोफेशनल डेव्हलपमेंट साठी उपयोगी असल्याचे सांगण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी होणेसाठी प्रा. सर्जेराव महारनवर सह मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. धनंजय गिराम यांनी केले.