आ.आवताडे यांचा आजपासून शासकीय अधिकारी व पदाधिकारी यांचेसमवेत तीन दिवसीय गावभेट दौरा

 आ.आवताडे यांचा आजपासून शासकीय अधिकारी व पदाधिकारी यांचेसमवेत तीन दिवसीय गावभेट दौरा




प्रतिनिधी - खरीप हंगामातील पाऊसाने ओढ दिल्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील भीषण पाणीप्रश्न,चारा, रोजगार व इतर प्रश्नांच्या अनुषंगाने जनतेच्या अडी-अडचणी तसेच विविध समस्या जाणून घेण्यासाठी व त्यावरती शासकीय अधिकारी व पदाधिकारी यांच्यामार्फत तोडगा काढण्यासाठी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांचा आजपासून मंगळवेढा तालुक्यामध्ये तीन दिवसीय गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा यांच्या वतीने देण्यात आली आहे.


आजपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यामध्ये आ आवताडे हे खालील नियोजित रूपरेषेनुसार गावभेट दौरा करणार आहेत. शुक्रवार, दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ८.३० वाजता माचणूर, ९.३० वाजता ब्रम्हपुरी, १०.१५ वाजता मुंढेवाडी, ११.०० वाजता रहाटेवाडी, दुपारी ११.४५ वाजता तामदर्डी, १२.३० वाजता तांडोर, २.३० सिद्धापूर, ३.३० बोराळे, सायं.४.३० वाजता अरळी, ५.३० वाजता नंदूर, ६.१५ वाजता डोणज, ७.०० वाजता भालेवाडी.


शनिवार, दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी, सकाळी ८.३० वाजता अकोले, ९.३० वाजता शेलेवाडी, १०.०० वाजता गणेशवाडी, १०.४५ वाजता आंधळगाव, दुपारी ११.४५ वाजता लेंडवे चिंचाळे, २.३० वाजता शिरसी, ३.३० वाजता गोणेवाडी, सायं.४.१५ वाजता खुपसंगी, ५.०० वाजता जालिहाळ, ५.४५ वाजता हाजापूर, ६.४५ वाजता डोंगरगाव, ७.३० वाजता कचरेवाडी.


रविवार, दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ८.३० वाजता बठाण, सकाळी ९.१५ उचेठाण, ९.३० वाजता मुढवी, १०.०० वाजता धर्मगाव, १०.४५ वाजता ढवळस, दुपारी ११.३० वाजता शरदनगर, १२.१५ वाजता देगांव, २.३० वाजता घरनिकी, ३.१५ मारापूर, सायं.४.१५ गुंजेगाव, ५.१५ वाजता महमदाबाद(शे), ५.४५ वाजता लक्ष्मी दहिवडी अशा मार्गावरून वरील वेळेनुसार हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.


यापूर्वी आ समाधान आवताडे यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने जनतेशी संवाद साधला होता त्या दौऱ्यामध्ये नागरिकांचे व जनतेचे विविध प्रश्न मार्गी लागल्याने त्या दौऱ्यास उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आजपासून सुरू झालेल्या होणाऱ्या या गाव भेट दौऱ्यामध्ये तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी व पदाधिकारी सोबत असल्याने याई दौऱ्यामध्ये जनतेचे प्रश्न ऑन द स्पॉट सोडवले जाण्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad