स्वेरी फार्मसीच्या ७ विद्यार्थ्यांची ‘एपिसोर्स’ या कंपनीत निवड


स्वेरी फार्मसीच्या ७ विद्यार्थ्यांची ‘एपिसोर्स’ या कंपनीत निवड



पंढरपूर-‘एपिसोर्स’या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी मधील ०७ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.

           फार्मसी (मेडिकल कोडींग) या क्षेत्राशी संबंधीत असलेल्या ‘एपिसोर्स’ या नामांकित कंपनीच्या निवड समितीने अंतिम फेरीतून फार्मसी विभागातील मंजुषा प्रभाकर बंडी, सिद्धेश्वर सुनील साखरे, विश्वजीत राजकुमार पाटील, गौरी संतोष दिघे, सोनम महादेव जाधव, प्रथमेश श्रीकांत साळुंखे व नागेश नवनाथ खाडे या ०७ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. या निवड प्रक्रियेकरीता ‘एपिसोर्स’ या कंपनीकडून अॅप्टिट्यूड, ग्रुप डिस्कशन, व एच.आर. राउंड अशा वेगवेगळ्या स्तरांवर निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. ही संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध व्हावी यासाठी कॉलेजच्या वतीने ‘एपिसोर्स’ या कंपनी सोबत समन्वय साधण्यात आला होता. ही निवड प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडली. त्यामधून स्वेरी फार्मसीच्या ०७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे प्रयत्न आणि स्वेरीतील शैक्षणिक कल्चर यामुळेच स्वेरीतील विद्यार्थ्यांना नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यातून स्वेरीवर असलेला पालकांचा विश्वास आणखी दृढ होत आहे. विद्यार्थ्यांना स्वेरीमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण तज्ञ प्राध्यापकांकडून दिले जाते. त्यामध्ये अॅप्टिट्यूड, कम्युनिकेशन स्किल, एडवॉन्स टेक्निकल ट्रेनिंग, मॉक इंटरव्यूव, ग्रुप डिस्कशन यांचा समावेश आहे. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. प्रदीप जाधव तसेच स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी ‘एपिसोर्स’ या कंपनीमध्ये झालेल्या इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad