*जगाला हवे असलेले संशोधन आवश्यक- डाॅ. कैलाश करांडे*
*पंढरपूर सिंहगड मध्ये "सिंहगड हॅकॅथाँन" स्पर्धेचे उद्घाटन*
पंढरपूर: प्रतिनिधी
शैक्षणिक आयुष्यात विद्यार्थ्यांनी जबाबदारी घेऊन अभ्यास करणे आवश्यक आहे. सद्या जगाला काय हवे आहे त्या दृष्टीकोनातून संशोधन होणे आवश्यक आहे. शिक्षक फक्त मार्ग दाखवत असतात. आपण स्वतःच स्वतःला घडवणे आवश्यक आहे. आठवड्यातून एखादे तरी आर्टिकल वाचणे आवश्यक आहे. जगाला नवनवीन काय देता येईल याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या हॅकॅथाँन मधुन चांगले संशोधन करून करिअर करावे असे मत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले आहे.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागात शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी "सिंहगड हॅकॅथाँन" हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मुबीन पिरजादे, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. नामदेव सावंत आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
यादरम्यान काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रा. सुभाष पिंगळे यांनी प्रास्ताविक कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव देण्यासाठी एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर हॅकॅथाँन स्पर्धा आयोजित करण्यात येते. हि स्पर्धा सलग दोन दिवस चालत असुन यामधून विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळत असते.
"सिंहगड हॅकॅथाँन" स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रा. नामदेव सावंत यांनी संबोधित केले.
या कार्यक्रमाचा सुञसंचालन ऐश्वर्या देशमुख आणि अस्मिता जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. नामदेव सावंत यांनी मानले.