अखेर युवाशक्ती ग्रामविकास संघठनच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले

 अखेर युवाशक्ती ग्रामविकास संघठनच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले



पंढरपूर/प्रतिनिधी 

ग्रामसेवकांची हजेरी बायोमॅट्रिक प्रणालीने लागू करण्याबाबत ग्रामविकास विभागाने महाराष्ट्रातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पत्राद्वारे सुचना दिली




महाराष्ट्रातील जवळपास 90% ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ठरलेल्या कामाच्या दिवशी किंवा कार्यालयीन वेळेत कधीही ग्रामपंचायत मध्ये हजर राहत नाही यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक त्रासून गेलेले आहेत व ग्रामसेवकांच्या अशा बेजबाबदारपणामुळे ग्राम विकासासाठी शासनाकडून आलेला लाखो रुपयांचा निधी सुद्धा परत जातो कारण त्यां निधीतून कामे करण्यासाठी ग्रामसेवक ग्रामपंचायतला हजर राहत नाही

ग्रामसेवकांच्या या मनमर्जी कारभाराला लगाम लावण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने युवाशक्ती ग्रामविकास संघठनेने संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या 32 जिल्ह्यातील जिल्हा संघटनांच्या माध्यमातून ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यासाठी डिसेंबर २०२१ पासून शासन दरबारी निवेदने देत सतत पाठपुरावा केला

अखेर ग्रामविकास मंत्रालयाने युवाशक्ती ग्रामविकास संघठनच्या वतीने 6 जून 2023 रोजी मुख्य सचिव ग्राम विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या निवेदनाचा संदर्भ देत 24 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्रातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या नावे पत्र क.संकीर्ण-२०२३/प्र.क्र.४५३/आस्था -७ काढत ग्रामसेवकांना नियमानुसार बायोमेट्रिक प्रणालीने हजेरी लागू करण्यासाठी सूचना दिलेल्या आहे युवाशक्ती ग्रामविकास संघठनांच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच सदस्यांनी ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्याचे आभार मानले व लवकरच ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरून सुद्धा शक्तीने अंमलबजावणी करण्यात येईल ही अपेक्षा व्यक्त केली

तसेच युवाशक्ती युवाशक्ती ग्रामविकास संघठनेचे संस्थापक/अध्यक्ष श्री इम्रान पठाण सचिव श्री पुरुषोत्तम सदार व सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश कर्चे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रमोद जगदाळे जिल्हा सचिव श्री बिभीषण बोरगावे व सर्व जिल्ह्या/तालुका पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की ग्रामविकास विभागाच्या सूचने नंतरही जर पुढील ०३ महिन्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकांच्या हजरीसाठी बायोमेट्रिक प्रणाली सुरू करण्यात आले नाही तर आता या विषयासाठी युवाशक्ती ग्राम विकास संघटनकडून राज्यभर आंदोलन करण्यात येईल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad