पंढरपूर सिंहगडच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात "बिग डेटा अनालिटिक्स" या विषयावर कार्यशाळा उत्साहात संपन्न

 *पंढरपूर सिंहगडच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात "बिग डेटा अनालिटिक्स" या विषयावर कार्यशाळा उत्साहात संपन्न*



पंढरपूर: प्रतिनिधी 


कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागांमध्ये बिग डेटा अनालिटिक्स या विषयावर शनिवार दिनांक २६ ऑगस्ट २०२३ रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

   या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून श्रीकृष्ण उत्पात यांना निमंत्रित करण्यात आले होते. श्रीकृष्ण उत्पात हे टाटा टेक्नॉलॉजी, पुणे या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये टेक्निकल लीड या पदावर कार्यरत आहेत. या कार्यशाळेत त्यांनी बिग डेटा अनालिटिक्स या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी १८० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

  या कार्यशाळेचे आयोजन प्रा. रमेश येवले यांनी केले. 

ही कार्यशाळा यशस्वी 

करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार प्रा. सुभाष पिंगळे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad