महसूल अधिकारी महसूल विभागाचा कणा पोलादपूरमध्ये महसूल सप्ताह सक्षमपणे राबवणार तहसीलदार कपिल घोरपडे प्रतिनिधी सुनिल ढेबे

 महसूल अधिकारी महसूल विभागाचा कणा पोलादपूरमध्ये महसूल सप्ताह सक्षमपणे राबवणार तहसीलदार कपिल घोरपडे

प्रतिनिधी सुनिल ढेबे



मा. उपविभागीय अधिकारी आणी तहसीलदार यांचे मार्गदर्शनाखाली महसूल नायब तहसीलदार व प्रभारी निवडणूक नायब तहसीलदार यांचे उपस्थिती मद्धे महसूल सप्ताह अंतर्गत दिनांक 02/08/2023 रोजी 194 महाड विधानसभा मतदार संघातील पोलादपूर तालुक्यातील सुंदरराव मोरे . महाविद्यालय पोलादपूर येथे युवा संवाद अंतर्गत नव मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले.

सदर कार्यक्रमात महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य आणी 100 हून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थित होती.

महसूल नायब तहसीलदार श्री. पाटील व प्र. निवडणूक नायब तहसीलदार श्रीम. जाधव मॅडम यांनी यांनी प्रशासनाच्या वतीने उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

18 ते 19 वयोगटातील युवक युवतींनी मतदार नोंदणी करावी यासाठी आवाहन करण्यात आले. कॉलेज मधील प्राध्यापक यांची सर यांची नियुक्ती निवडणूक नोडल अधिकारी म्हणून करण्यात आली आणि तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली. जास्तीत जास्त मतदान नोंदणी करणे कामी नियुक्त प्राध्यापक आणि विद्यार्थिनीमार्फत जास्तीत जास्त जनजागृती करून नव मतदार नोंदणी करून प्रशासना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. मतदार यादीतील 80 वर्षापेक्षा जास्त वयाचे मतदार यांची पडताळणी करणे तसेच मतदार यादीतील तांत्रिक चुका दुरुस्त करणे कामी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी अधिकारी या अभियानांतर्गत गृह भेट देणार आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या गावात येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना सहकार्य करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले. गेले दोन वर्षात आपल्या राज्यावर नैसर्गिक आपत्ती मुळे अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगांना सामोरे कसे जायचे त्याकरता कोणती पूर्वतयारी करावी तसेच आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले. त्याचवेळी तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थिनी आपदा मित्र म्हणून तसेच महसूल दूत म्हणून काम करावे असे आवाहन केले. सध्याचे स्पर्धा परीक्षांचे युग पाहता माननीय कोकण विभागीय आयुक्त तसेच माजी जिल्हाधिकारी कल्याणकर सरांनी गरुड झेप फाउंडेशन तर्फे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन स्पर्धा परीक्षांकरता घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाची माहिती उपस्थिताना देऊन सदर प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad