पंढरपूर सिंहगडच्या ओंकारेश्वर आढवळकर विद्यार्थ्यांला कॅम्पस प्लेसमेंट मधुन ६.५० लाखाची नोकरी

 *पंढरपूर सिंहगडच्या ओंकारेश्वर आढवळकर विद्यार्थ्यांला कॅम्पस प्लेसमेंट मधुन ६.५० लाखाची नोकरी*




पंढरपूर: प्रतिनिधी 



एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण पुर्ण केलेले ओंकारेश्वर हणमंत आढवळकर या विद्यार्थ्यांची "एजवर्व सिस्टम्स लिमिटेड" या कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.

"एजवर्व सिस्टम्स लिमिटेड" हि कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निग, बेकिंग क्षेञ, सप्लाय चेन, क्लाऊड कॉम्प्युटिंग, रोबोटिक्स ऑटोमेशन आदी क्षेत्रात सेवा प्रदान करते. अशा नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेतलेल्या ओंकारेश्वर हणमंत आढवळकर यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन कंपनीकडून ६.५० लाख रूपये वार्षिक पगार मिळणार आहे.

   "एजवर्व सिस्टम्स लिमिटेड" या कंपनीत निवड झाल्याबद्दल ओंकारेश्वर आढवळकर यांचे महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अतुल कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad