*तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारत श्री कपिल घोरपडे साहेब यांनी अल्पावधीतच लोकाभिमुख कारभाराद्वारे पोलादपूर तहसिल कार्यालयाची वेगळी ओळख निर्माण केली.*
सर्वप्रथम महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना महसूल दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
महसुली वसुलीचे उद्दिष्ट ओलांडण्याकरिता तसेच महसूल विभागाच्या मूलभूत जबाबदाऱ्या पार पाडण्याकरिता अथक प्रयत्न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पाठीवर कौतुकाची थाप देण्याकरिता त्यांचा यथोचित सत्कार करुन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो.
शासनाचा कणा म्हणून काम करणार्या महसूल विभागाची सुरुवात ही जरी जमीन महसूल गोळा करणारा आणि कायदा व सुव्यवस्था राखणारा विभाग म्हणून झालेली असली तरी सध्या लोकसभा,विधानसभा,जिल्हा परिषद व ग्राम पंचायतीच्या निवडणूका निर्वेधपणे पार पाडणे,गौणखनिज स्वामित्वधन वसूली व दंडात्मक कारवाई करणे,जनगणना,कृषि गणना, आर्थिक व सामाजिक गणना,रोजगार हमी योजना राबविणे,विविध सामाजिक अर्थसाहाय्य योजना-जसे संजय गांधी निराधार योजना ,इंदिरा गांधी वृद्धापकाळ/विधवा योजना ची अंमलबजावणी करणे,जात प्रमाणपत्र जारी करणे,विविध दाखले जसे-ऐपत प्रमाणपत्र,रहिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र,शेतकरी दाखला,भूमिहीन मजूर इ. सह इतर प्रमाणपत्रे नागरिकास देणे,टंचाई,अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्ती काळात नागरिकांचा जीव वाचवून त्यांना मदत मिळवून देणे,विविध अनुदानांचे वाटप या व इतर अनेक प्रकारची कामे महसूल विभागाकडून अविरतपणे पार पाडली जात आहेत. तसेच शासनाची कोणतीही नवीन योजना आली किंवा अभियान आले तरी त्यात महसूल विभागाचा सिंहाचा वाटा हा असतोच !
वाटा हा असतोच !
जसे अलिकडील प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना
*महसूल सप्ताह*
*1)* महसूल सप्ताह अनुषंगाने सर्व महसूल कार्यालयांची स्वच्छता करण्यात आली होती व येणार्या नागरिकांसाठी सुविधा देण्यात आल्या आहेत.
*2)* महसूल सप्ताह *शुभारंभ* माननीय डॉ. दिपा भोसले मॅडम उपजिल्हाधिकारी भूसंपादन( माणगाव) तथा समन्वय अधिकारी महसूल सप्ताह यांचे उपस्थितीत व तालुका स्तरीय विभाग प्रमुख, माजी सैनिक, तलाठी मंडळ अधिकारी लोकप्रतिनिधी व तालुक्यातील नागरिकांच्या उपस्थितीत समारंभ पूर्वक करण्यात आला.
*3)* उपस्थित सर्व नागरिकांना महसूल विभागाच्या राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती देऊन सर्व तालुका स्तरीय विभाग प्रमुखांना या बाबत त्यांचे कार्यालयीन स्तरावर प्रसिद्धी देण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
*4)* स्थानिक लोकप्रतिनिधींना गाव चावडीवर आमंत्रित करण्यात आले होते व महसूल विभागाच्या इ हक्क, इ Mutation, इ पीक पाहणी, सामाजिक अर्थ सहाय्य योजनेची माहिती देण्यात आली.
*5)* कुडपण बुद्रुक गावातील दरड आपत्ति अनुषंगाने NDRF टीम सोबत तालुका विकास अधिकारी यांचे सह गाव भेट देण्यात आली नागरिकाची विस्थापन व्यवस्था पाहणी केली