पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते कर्मयोगी श्रधेय सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी सलग ९ दिवस शिबीर
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते कर्मयोगी श्रधेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी पंढरपूर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर सलग ९ दिवस चालणारे शिबीर पांडुरंग परिवार युवक आघाडी व प्रणव परिचारक युवा मंच,पंढरपूर-मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने आज प्राथमिक आरोग्य केंद्र, भाळवणी येथे "भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर" त्याचप्रमाणे मोफत आयुष्यमान भारत कार्ड व मोफत आधार कार्ड दुरुस्ती अभियान आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपा युवक नेते प्रणव परिचारक यांनी दिली.
जिल्हाचे नेते आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पांडूरंग परिवाराचे जेष्ठ सहकारी, भाजपा नेते मंडळी, पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिल्या दिवशीच्या शिबिराचा पांडूरंग परिवाराचे जेष्ठ सहकारी संभाजी केसकर व युवक नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते प्रतिमापूजन करत शुभारंभ केला.
अनेक गरजू रुग्णांना असणाऱ्या डोळ्याच्या समस्या, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, रक्ततपासणी अश्या एक ना अनेक मोफत आणि प्रभावी इलाज व सुख सोयींचा पुरवठा या माध्यमातून करण्यात आला. खऱ्या अर्थाने रुग्णांना हे शिबिर लाभदायक ठरेल असा विश्वास या निमित्ताने परिचारक यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी आरोग्य केंद्रातील सर्व स्टाफ, एच.व्हि.देसाई हॉस्पिटल, पुणे येथील डॉक्टर्स, स्थानिक पदाधिकारी, आशा वर्करस, कर्मचारी बंधू आणि माता-भगिनीं तसेच इतर मान्यवर तरूण सहकारी मित्र उपस्थित होते.