अभियांत्रिकी शिक्षण हे आव्हानात्मक करिअर- डाॅ. कैलाश करांडे* ○ पंढरपूर सिंहगड मध्ये विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

 *अभियांत्रिकी शिक्षण हे आव्हानात्मक करिअर- डाॅ. कैलाश करांडे*


○ पंढरपूर सिंहगड मध्ये विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ



पंढरपूर: प्रतिनिधी


अलिकडच्या काळात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढल्या आहेत. समाजाला चांगल्या डाॅक्टर, शास्त्रज्ञ, शेतकरी, समाजसेवक, वकील, उद्योजक इंजिनिअर अशा अनेक घटकांची गरज असते. शिक्षण हे जगण्याचं साधन न मानता ते जगविण्यासाठी अशी धारणा विद्यार्थ्यांची असणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी शिक्षणाचा मार्ग निवड असताना जी शाखा आवडीची आहे त्याला प्राधान्य द्यावे. परंतु जर आवडीची शाखा मिळाली नाही तर जी मिळाली आहे. त्यावर झोकून देऊन अभ्यास करणे आवश्यक असते. प्रत्येक विद्यार्थ्यांला दहावी व बारावीनंतरच्या वळणावर शिक्षणाचा मार्ग निवडताना अभियांत्रिकीचे शिक्षण अतिशय उत्तम पर्याय असुन अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेतून शिक्षण घेऊन बाहेर पडणा-या प्रत्येक इंजिनिअर्सना अमर्याद संधी उपलब्ध असतात. अशा अभियांत्रिकीच्या आव्हानात्मक करिअरच्या शिक्षणात आपण भविष्यात यशस्वी व्हावे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी बोलताना व्यक्त केले.

    


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये सोमवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी प्रथम वर्ष अभियांत्रिकीतुन द्वितीय वर्षात पदार्पण केलेल्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता.

    यामध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर आदींनी उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad