*पंढरपूर सिंहगड मध्ये "फुल स्टॅक डेव्हलपमेंट" या विषयावर व्हॅल्यू एडिशन प्रोग्रॅम संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी फुल स्टॅक डेव्हलपमेंट या विषयावरती व्हॅल्यू एडिशन प्रोग्रॅम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या असल्याची माहिती कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सुरज पवार प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. व्हॅल्यू एडिशन प्रोग्रॅम हा विद्यार्थ्यांना अतिरिक्त टेक्नॉलॉजीचे नॉलेज देण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मनोगत प्रा. सुभाष पिंगळे यांनी व्यक्त केले एडिशन प्रोग्रॅम हा फुलस्टेक टेक्नॉलॉजी वरती आयोजित करण्यात आला होता हा प्रोग्रॅम ८४ तासाचा होता. जवळ जवळ बारा दिवस हा प्रोग्रॅम चालला. या व्हॅल्युएशन प्रोग्राम मध्ये आयटी क्षेत्रातील नवीन टेक्नॉलॉजी फुलस्टेक डेव्हलपमेंट बद्दलचे संपूर्ण ज्ञान विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला गेला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग असे विविध प्रकारचे प्रोग्राम आयोजित करत असतात.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.