स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ऋतुजा ढोले यांची ‘नेक्सेंशियल सोल्युशन्स’ कंपनीत निवड मिळाले वार्षिक रु. ३ लाखांचे पॅकेज


  ऋतुजा ढोले यांची ‘नेक्सेंशियल सोल्युशन्स’ कंपनीत निवड

मिळाले वार्षिक रु. ३ लाखांचे पॅकेज



पंढरपूरः ‘नेक्सेंशियल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या नामांकीत कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील ऋतुजा भारत ढोले यांची कॅम्पस मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

         आय.टी.क्षेत्राशी संबंधीत बंगलोर येथील ‘नेक्सेंशियल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या नामांकीत कंपनीच्या समितीने घेतलेल्या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या ऋतुजा भारत ढोले या विद्यार्थिनीची निवड केली असून त्यांना वार्षिक रु. ३ लाख इतके पॅकेज मिळाले आहे. विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे प्रयत्न आणि स्वेरीतील शैक्षणिक कल्चर यामुळेच स्वेरीतील विद्यार्थ्यांना भरपूर नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यातून स्वेरीवर असलेला पालकांचा विश्वास आणखी दृढ होत आहे. स्वेरी अभियांत्रिकीमध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या प्लेसमेंट साठी येत असतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. या विद्यार्थ्यांना स्वेरी मध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये अॅप्टिट्यूड, कम्युनिकेशन स्किल, एडवॉन्स टेक्निकल ट्रेनिंग, मॉक इंटरव्यूव, ग्रुप डिस्कशन, सॉफ्टवेअर ट्रेनींग या व्यतिरिक्त जागतिक स्तरावर संधी मिळण्यासाठी जापनीज लैंग्वेज ट्रेनींग तसेच जीआरई, टोफेल या संदर्भात मार्गदर्शन केले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातील तज्ञ प्राध्यापकांचे व विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युव मधून निवड झालेल्या ऋतुजा भारत ढोले यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad