पंढरपूर सिंहगडच्या ३ विद्यार्थ्यांची "व्हिल्स इंडिया" कंपनीत निवड*

*पंढरपूर सिंहगडच्या ३ विद्यार्थ्यांची "व्हिल्स इंडिया" कंपनीत निवड*



पंढरपूर: प्रतिनिधी


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील अतुल मोहन लोंढे, प्राजक्ता शंकर उंबरकर आणि बाळू गोरख वाघमारे या ३ विद्यार्थ्यांची "व्हिल्स इंडिया" कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन कंपनीकडून ३.५२ लाख रूपये वार्षिक पॅकेज मिळणार असल्याची माहिती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. भालचंद्र गोडबोले यांनी दिली.

  व्हिल्स इंडिया, टी एस एफ समूहाची कंपनी असुन या कंपनीकडून स्टील, ॲल्युमिनियम आणि वायर व्हिल्सच्या जगातील सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे. १९६० मध्ये या कंपनी स्थापना झाली असुन स्थापनेपासून या कंपनीने जागतिक दर्जाची उत्पादन तयार करण्यासाठी आणि वितरित करण्यासाठी अभियांञिकी क्षमतांमध्ये सात्यत्याने वाढ केली आहे. यामध्ये बस, ट्रक, चासिस सस्पेन्स उत्पादने, हायड्रॉलिक सिलेंडर, कस्टम फॅब्रिकेटेड असेंब्ली आदी उत्पादने तयार करण्यास "व्हिल्स इंडिया" कंपनी अग्रेसर आहे. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील अतुल मोहन लोंढे, बाळू गोरख वाघमारे, प्राजक्ता शंकर उंबरकर या तीन विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली आहे.

    "व्हिल्स इंडिया" कंपनीत निवड झाल्यालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. दत्तात्रय कोरके आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad